दलित वस्तीसाठी मिळाले केवळ १० कोटी
By admin | Published: February 8, 2015 11:40 PM2015-02-08T23:40:37+5:302015-02-08T23:40:37+5:30
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेसाठी ६७५ गावांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यासाठी ३० कोटींची आवश्यकता आहे.
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेसाठी ६७५ गावांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यासाठी ३० कोटींची आवश्यकता आहे. मात्र प्रत्यक्षात १० कोटींच जिल्ह्याला मिळाले. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अनुसूचित जाती, जमातीच्या घटकांसाठी दलित वस्ती सुधार योजना राबविली जाते. यामाध्यमातून वस्तीतील मुलभूत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. स्वच्छता, रस्ता, पाणी, समाजमंदिर आणि नाल्याच्या प्रश्न सोडविण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या निकषावर गाव विकासाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यातून पात्र प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाची बैठक पारपडली. या बैठकीत ६७५ गावांचे प्रस्ताव ठेवण्यात आले. मात्र निधी अपुरा असल्याने मर्यादित गावांचीच निवड करण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)