शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ
By admin | Published: June 10, 2017 02:45 AM2017-06-10T02:45:21+5:302017-06-10T02:45:35+5:30
शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या
नितीन अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : शेतकरी आणि गरिबांसाठी काम करत असल्याचा दावा मोदी सरकार भलेही करत असेल; पण कृषी मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिसून येत आहे की, शेतमालाच्या आधारभूत दरात फक्त ११ ते २२ टक्के वाढ झाली आहे.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा सांगत आहेत की, शेतकऱ्यांना खर्चाच्या ४३ टक्के नफा जोडून दिला जात आहे; पण प्रत्यक्षात मोदी सरकारने शेतमालाच्या दरात किरकोळ वाढ केली आहे.
काय सांगते आकडेवारी?
२०१४ च्या तुलनेत २०१७ मध्ये रब्बीच्या पिकांच्या आधारभूत दरात २० टक्के आणि खरिपासाठी ११ टक्के वाढ देण्यात आली. २०१४ - १५ मध्ये गव्हासाठी १४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर निश्चित केला होता. २०१६ - १७ मध्ये हा दर १६२५ करण्याची शिफारस करण्यात आली. हरभऱ्याच्या दरात ३१७५ वरून ४००० एवढी वाढ केली. मसूर डाळीची आधारभूत किंमत ३०७५ वरुन ३९५० प्रति क्विंटल केली. ३१०० रुपये प्रति क्विंटलच्या मोहरीच्या दरात ३७०० पर्यंत वाढ केली.
खरिपाच्या पिकांसाठीही आधारभूत दर वाढविण्यात आले. ज्वारीसाठी आधारभूत दर १५७० वरुन १६२५ केले. बाजरी १२७५ वरून १३३०, तूर डाळ ४६२५ वरून ५०५० रुपये, मूग ४८५० वरून ५२२५ आणि उडीद ४६२५ वरून ५००० रुपये दर करण्यात आले.