पहिल्यांदाच भाषण देणाऱ्या सदस्यांना फक्त १५ मिनिटे; 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:47 PM2023-01-25T17:47:48+5:302023-01-25T17:48:20+5:30
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 बैठका घेणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
दिल्लीत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी पहिल्यांदाच भाषण देणाऱ्या सदस्यांना १५ मिनिटांचाच वेळ दिला आहे. सभागृहातील वेळेचे नियोजन प्रभावित होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. महासचिव पी सी मोदी यांनी लोकसभेच्या सभापतींच्या निर्देशाचा उल्लेख केला आहे.
संसदीय पद्धतीनुसार, सभागृहात पहिले भाषण करणाऱ्या सदस्यांना बोलताना अडथळा आणत नाहीत. नवीन सदस्यांच्या भाषणासाठीही अध्यक्षांकडून योग्य वेळ दिला जातो. काहीवेळा सभासद आपले पहिले भाषण करणार्याला नेहमीपेक्षा वेळ घेतात असे दिसून आले आहे. यामुळे पुढचे काम प्रभावित होते. काहीवेळा ते चर्चेच्या विषयापासून दूर जातात, यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मोदी म्हणाले.
पहिले भाषण करणार्या सदस्याने आपले भाषण अशा रीतीने केले पाहिजे की त्याचा दिवसाच्या नियोजित कामकाजाच्या वेळेच्या व्यवस्थापनावर परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. तसेच यासाठी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. कोणत्याही सदस्याने त्यांनी नोटीस दिलेली आणि जी सभापतींकडे प्रलंबित आहे, अशी बाब सभागृहात मांडू नये, असेही सूचित करण्यात आले आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 बैठका घेणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारीपासून १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार असून 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.