जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

By admin | Published: May 27, 2016 06:58 PM2016-05-27T18:58:54+5:302016-05-27T21:21:20+5:30

यंदा भारतात सर्वत्र प्रचंड पाणीटंचाई असून, देशातील ९१ मोठ्या जलाशयांमध्ये आजच्या घटकेला एकूण क्षमतेच्या केवळ १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

Only 17 percent water stock in reservoirs | जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

जलाशयांमध्ये केवळ १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Next

ऑनलाइन लोकमत

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयांची स्थिती अधिक चिंताजनक आहे. त्यामुळे या राज्यांतील लाखो लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही भागांत पाण्याचे टँकर पाठवण्यात येत असले तरी ते चार ते पाच दिवसांनी जात असल्याने मिळणारे पाणी अपुरे आहे. शहरी भागात तुलनेते पाण्याची स्थिती बरी आहे. मात्र ग्रामीण भागांत पाणीटंचाई अतिशय तीव्र आहे. पाण्याअभावी शेतीची कामे थांबली असून, अनेक उद्योगही बंद करावे लागले आहेत, असं वृत्त पब्लिक डोमेन आणि इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

वरील राज्यांच्या तुलनेत आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि राजस्थानची स्थिती बरी असून, तेथील जलाशयांमध्ये गेल्या वर्षीइतकाच पाणीसाठी आहे. केंद्रीय जलसंसाधन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार यंदा देशातील जलाशयांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ४५ टक्के पाणी आहे. गेल्या १0 वर्षांच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठी २१ टक्के कमी आहे. यंदा जलाशयांमध्ये २६. ८१६ दशलक्ष क्युबीक मीटर पाणी शिल्लक आहे. या ९१ जलाशयांची क्षमता १५७. ७९९ दशलक्ष क्युबीक मीटर इतकी आहे. देशातील सर्व जलाशयांची पाणीसाठी क्षमता २५३. ८८ दशलक्ष क्युबीक मीटर आहे. त्यातील ३७ जलाशयांतील पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो.

Web Title: Only 17 percent water stock in reservoirs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.