राष्ट्रीयकृत बँकाची केवळ ३० कोटी कर्जवाटप जिल्हाधिकार्‍यांची नाराजी : पुनर्गठनाची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या अर्जाचा विचार करा

By admin | Published: May 17, 2016 01:04 AM2016-05-17T01:04:30+5:302016-05-17T01:04:30+5:30

जळगाव- शासनातर्फे शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ३०.७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.

Only 30 crores of nationalized banks debt relief for the district collectors: consider the application of farmers demanding reconstitution | राष्ट्रीयकृत बँकाची केवळ ३० कोटी कर्जवाटप जिल्हाधिकार्‍यांची नाराजी : पुनर्गठनाची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या अर्जाचा विचार करा

राष्ट्रीयकृत बँकाची केवळ ३० कोटी कर्जवाटप जिल्हाधिकार्‍यांची नाराजी : पुनर्गठनाची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या अर्जाचा विचार करा

Next
गाव- शासनातर्फे शेतकर्‍यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले असताना राष्ट्रीयकृत बँकानी केवळ ३०.७८ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी ५ वाजता जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, लीड बँकेचे प्रतिनिधी मराठे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पीक कर्ज वाटप तसेच पुनर्गठनाबाबतचा आढावा घेतला. राष्ट्रीयकृत बँकातर्फे केवळ ३० कोटी ७८ लाखांचे पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती मराठे यांनी दिली. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५७० कोटी पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी किती शेतकर्‍यांचे अर्ज आले त्याबाबत आढावा घेतला. शेतकर्‍यांनी पीक कर्ज पुनर्गठनाचे अर्ज दिल्यास त्या अर्जावर कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली.
२४ रोजी पुन्हा बैठक
राष्ट्रीयकृत बँकांची अत्यल्प कर्ज वाटप झाल्याने त्याला वेग देण्यासाठी २४ मे रोजी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला बँकांचे प्रतिनिधी तसेच व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Only 30 crores of nationalized banks debt relief for the district collectors: consider the application of farmers demanding reconstitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.