२७पैकी ९ टक्केच हिंदू बांगलादेशात शिल्लक! उर्वरित गेले कुठे? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 09:56 AM2024-08-19T09:56:57+5:302024-08-19T10:18:56+5:30

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हा लाखो निर्वासितांना न्याय देण्यासाठी आहे. कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद या कायद्यात नसल्याची हमी गृहमंत्री अमित शाह यांनी अल्पसंख्याकांना यावेळी दिली.

Only 9 percent of 27 Hindus remain in Bangladesh! Where did the rest go? Union Home Minister Amit Shah's question | २७पैकी ९ टक्केच हिंदू बांगलादेशात शिल्लक! उर्वरित गेले कुठे? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सवाल

२७पैकी ९ टक्केच हिंदू बांगलादेशात शिल्लक! उर्वरित गेले कुठे? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा सवाल

अहमदाबाद : फाळणीच्या वेळी बांगलादेशात २७ टक्के हिंदू होते. आता केवळ ९ टक्के आहेत. उर्वरित गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी, एक तर या हिंदूंचे बळजबरी धर्मांतर केले गेले किंवा आश्रयासाठी त्यांनी भारतात धाव घेतली असल्याचे येथे रविवारी एका कार्यक्रमात बोलताना नमूद केले.

काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या तुष्टीकरणाच्या धाेरणामुळे देशात माेठ्या संख्येने असलेल्या निर्वासितांना वर्षानुवर्षे नागरिकत्वाचा हक्क मिळू शकला नाही, अशी टीका त्यांनी केली.

 नागरिकत्व हिरावून घेणार नाही
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) हा लाखो निर्वासितांना न्याय देण्यासाठी आहे. कुणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद या कायद्यात नसल्याची हमी गृहमंत्री अमित शाह यांनी अल्पसंख्याकांना यावेळी दिली.

न्यायाच्या प्रतीक्षेत...
शेजारी देशांत केवळ हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख आहेत म्हणून अनेकांचा छळ होत राहिला आणि भारतात लाखो-कोट्यवधी लोक तीन पिढ्यांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत राहिले. घुसखोरांना पूर्वीच्या सरकारांनी नागरिकत्व बहाल केले; परंतु हक्क मागणाऱ्यांना तो नाकारण्यात आला, असे शाह म्हणाले.

कायदा काय आहे?
२०१४ मध्ये भाजपने नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याचे आश्वासन दिले होते़. त्यानुसार २०१९ मध्ये त्या आश्वासनाची पूर्ती करण्यात आली. यामुळे कोट्यवधी हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख लोकांना न्याय मिळाला. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी आहे, नागरिकत्व काढून घेण्याची तरतूदच या कायद्यात नाही.

Web Title: Only 9 percent of 27 Hindus remain in Bangladesh! Where did the rest go? Union Home Minister Amit Shah's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.