सॉफ्टवेअर अपडेटनंतरच ATM सुरु करा - RBI

By admin | Published: May 15, 2017 10:17 AM2017-05-15T10:17:46+5:302017-05-15T10:41:02+5:30

जगभरात सध्या रॅन्समवेअर" व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. एटीएम मशीन्सनाही या व्हायरसपासून धोका असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.

Only after the software update - RBI | सॉफ्टवेअर अपडेटनंतरच ATM सुरु करा - RBI

सॉफ्टवेअर अपडेटनंतरच ATM सुरु करा - RBI

Next

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 15 - जगभरात सध्या रॅन्समवेअर" व्हायरसने धुमाकूळ घातला आहे.  एटीएम मशीन्सनाही या व्हायरसपासून धोका असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना त्यांच्या ATM सिस्टीम अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी अचानक झालेल्या सायबर हल्ल्याचा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका बसला आहे.  देशातील 2.25 लाख एटीएमपैकी 60 टक्क्याहून अधिक एटीएममध्ये आऊटडेटेड विंडोज एक्सपी सिस्टीम आहे.  
 
या सिस्टीमचे नियंत्रण त्या विक्रेत्यांकडे असते जे बँकेला ही सिस्टीम पुरवितात. एटीएममध्ये तात्काळ अपडेट करा, तो पर्यंत एटीएममशीन्स वापरु नका असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत. त्यामुळे आधीच कॅश नसल्याने खडखडाट असलेल्या एटीएममशीन्स काही तासांठी बंद राहू शकतात. ग्राहकांची माहिती आणि खात्यातील रोख रक्कमेला कोणताही धोका नसल्याचे एटीएम मशीन्सचे व्यवस्थापन करणा-या कंपनीने सांगितले. 
 
आंध्र प्रदेश पोलिसांच्या १०२ सिस्टीमला हॅकर्सने हॅक केल्यानंतर देशातील सायबर हल्ल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आंध्रातील सायबर अ‍ॅटॅकनंतर मायक्रोसॉफ्टने विंडोज एक्सपीसाठी अपडेट रीलीज केले आहेत. जर भारतातील एटीएमला सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केले तर परिस्थिती किती बिकट होऊ शकते याचा अंदाज कोणी लावू शकत नाही. 
 
पंतप्रधान कार्यालयातील राष्ट्रीय सायबर सुरक्षा सल्लागार गुलशन राय यांनी सांगितले की, अशा १०० सिस्टीमवर हल्ला झाला होता. पण, आता कोणताही धोका नाही. सायबर हल्लेखोर या डेटाला इनस्क्रिप्ट करून लॉक करतात. डेटाला डिक्रिप्ट करण्यासाठी ते रक्कम मागतात. चेन्नईच्या बाहेरच्या भागातील निस्सान - रेनॉल्ट या कंपनीचे उत्पादन सायबर हल्ल्यामुळे बंद करण्यात आले होते, असे सांगण्यात येत आहे. पण, कंपनीने यावर काही भाष्य केले नाही. सरकारी आकडेवारीनुसार, गत १२ ते १४ महिन्यांत भारतात ११ हजार नेटवर्कविरुद्ध हल्ले झाले आहेत. भारत त्या ९९ देशांपैकी एक आहे ज्या देशात अधिकाधिक सायबर हल्ले होतात.
 

Web Title: Only after the software update - RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.