फक्त एका परिच्छेदाच्या बायोडाटाच्या आधारे गजेंद्र चौहान यांची निवड
By admin | Published: August 2, 2015 03:30 PM2015-08-02T15:30:40+5:302015-08-02T15:30:40+5:30
एफटीआयआयचे अध्यक्षपदावर गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यावरुन सुरु असलेला वाद अद्याप शमला नसतानाच गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती प्रक्रियेतील धक्कादायक बाबी समोर आल्या आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - एफटीआयआयचे अध्यक्षपदावर गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यावरुन सुरु असलेला वाद अद्याप शमला नसतानाच गजेंद्र चौहान यांच्या नियुक्ती प्रक्रियेतील धक्कादायक बाबी समोर आल्या आहे. अध्यक्षपदासाठी गजेंद्र चौहान यांनी फक्त एका परिच्छेदाचा बायोडाटा पाठवल्याची माहिती उघड झाली आहे.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले गजेंद्र चौहान यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेविषयी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवण्यात आली होती. या अर्जावर माहिती व प्रसारण मंत्रालयाने उत्तर दिले आहे. गजेंद्र चौहान यांनी त्यांच्या बायोडाटामध्ये स्वतःची ओळख फक्त एका परिच्छेदामध्येच सांगितली आहे. चौहान म्हणातात, गजेंद्र चौहान हे एक चांगले अभिनेते असून त्यांनी महाभारतमध्ये युधिष्ठीराची भूमिका केली आहे. त्यांनी १५० चित्रपट व ६०० मालिकांमध्ये काम केले आहे.' या एकाच परिच्छेदाच्या आधारे गजेंद्र चौहान यांची नियुक्ती कशी काय केली गेली असा सवाल आता उपस्थित होत आहे.
अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधू विनोद चोप्रा, राजू हिरानी, जया बच्चन, अडूर गोपालकृष्णन, रमेश सिप्पी, गोविंद निहलानी व आमीर खान या दिग्गज्जांचा अध्यक्षपदासाठी विचार केला होता. मात्र शेवटी फक्त एका परिच्छेदाच्या आधारे गजेंद्र चौहान यांचे पारडे जड ठरले व त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली.