पाकिस्तानने ठोस कारवाई केली तरच, परराष्ट्र स्तरावरील चर्चा
By admin | Published: January 7, 2016 06:48 PM2016-01-07T18:48:38+5:302016-01-07T18:48:38+5:30
पठाणकोट अतिरेकी हल्ल्यासंदर्भात पाकने ठोस कारवाई केली तर चर्चा शक्य असल्याचे भारताने स्पष्ट केले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासंदर्भात भारताने कारवाई करण्यायोग्य पुरावे पाकिस्तानला दिले असून, पाकिस्तानने त्यावर ठोस कारवाई केली तरच, भारत-पाकिस्तामध्ये परराष्ट्रस्तरावरची चर्चा होईल असे भारताने गुरुवारी स्पष्ट केले.
भारत-पाकिस्तानमधील आगामी परराष्ट्रस्तरावरील चर्चेसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आता चेंडू पाकिस्तानच्या कोर्टात आहे असे उत्तर परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिले. भारत सरकारची पाकिस्तानबद्दलची भूमिका सातत्यपूर्ण आणि स्पष्ट आहे.
पाकिस्तानसह आम्हाला सर्वच शेजा-यांबरोबर चांगले संबंध हवे आहेत. पण भारत सीमेपलीकडून होणार दहशतवाद अजिबात सहन करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र स्तरावरील चर्चेबद्दल या घटकेला जास्त बोलणे घाईचे ठरेल असे स्वरुप यांनी सांगितले.