खात्यात 28 लाख रुपये असतील तरच अरविंद केजरीवाल देणार निवडणूक तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 11:41 AM2017-09-02T11:41:47+5:302017-09-02T11:44:19+5:30

जर एखाद्याला आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढायची असेल तर त्याच्या खात्यावर किमान 28 लाख रुपये असणं गरजेचं असणार आहे

Only if there is Rs 28 lakh in the account, Arvind Kejriwal will get the election ticket | खात्यात 28 लाख रुपये असतील तरच अरविंद केजरीवाल देणार निवडणूक तिकीट

खात्यात 28 लाख रुपये असतील तरच अरविंद केजरीवाल देणार निवडणूक तिकीट

Next

अहमदाबाद, दि. 2 - पक्षनिधीवरुन नेहमी आरोपांना सामोरं जाव लागणा-या आम आदमी पक्षाने गुजरात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणा-यांसमोर एक अट ठेवली आहे. जर एखाद्याला आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढायची असेल तर त्याच्या खात्यावर किमान 28 लाख रुपये असणं गरजेचं असणार आहे. निवडणूक लढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता ही अट ठेवण्यात आली आहे. उमेदवार आर्थिकदृष्या सक्षम असल्याने निवडणूक लढणं सोपं जाईल असा तर्क आम आदमी पक्षाने लावला आहे.

गुजरातचे पार्टी प्रभारी आणि राष्ट्रीय नेते गोपाल राय यांची शुक्रवारी पक्ष सदस्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीत त्यांनी या प्रस्तावावर चर्चा केली. या बैठकीत सामील झालेल्या एका सदस्याने सांगितलं आहे की, 'कोणत्याही उमेदवाराला चांगल्या प्रकारे निवडणूक प्रचार करायचा असल्यास त्याच्याकडे किमान 28 लाख रुपये असणं गरजेचं आहे'. उमेदवारांसाठी इतर काय अटी असतील असं विचारलं असता आम आदमी पक्षाचे प्रवक्ता हर्षिल नायक यांनी सांगितलं की, 'उमेदवाराची प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे. सोबतच त्याच्या मतदारसंघात चांगलं नेटवर्क असणं गरजेचं आहे. सोबतच मतदान केंद्रावर नजर ठेऊ शकतील असे किमान दोघेजण सोबत असले पाहिजेत'. 

पाक्ष कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष 17 सप्टेंबरपासून निवडणूक प्रचाराला जोमाने सुरुवात करणार आहे. 'अनेक ठिकाणी कार आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे. आम्हाला परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे. कदाचित तारीख बदलावीदेखील लागू शकते. सर्व जागांवर नाही पण महत्वाच्या जागांवर आम्ही निवडणूक लढणार आहोत', अशी माहिती कार्यकर्त्याने दिली आहे. 

गुजरातमध्ये निवडणूक जसजशी जवळ येऊन लागली आहे तसंतसं वातावरण तापू लागलं आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला आपल्या वाढदिवशी प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांपासून भाजपा सत्तेत आहे. 2012 मध्ये भाजपाने 182 पैकी 119 जागा जिंकत विजय मिळवला होता. त्यावेळी काँग्रेसला फक्त 57 जागा मिळाल्या होत्या. 

एका सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार भाजपाला विधानसभा निवडणुकीत तब्बल 144 ते 152 जागा मिळण्याची शक्यता असून पुन्हा एकदा भाजपा सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसला अवघ्या 26 ते 32 मिळतील असा अंदाज आहे. 

Web Title: Only if there is Rs 28 lakh in the account, Arvind Kejriwal will get the election ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.