‘पीजी’ डॉक्टरांनाच ऑपरेशनची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 05:44 AM2020-11-24T05:44:43+5:302020-11-24T05:44:52+5:30
आयुर्वेद : आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : आयुर्वेदिक डॉक्टरही आता ऑपरेशन करू शकतील, असे वृत्त आल्यानंतर आयुष मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, याची घोषणा २०१६ मध्येच झाली होती. ५८ प्रकारच्या सर्जिकल प्रक्रियेलाच परवानगी देण्यात आलेली आहे आणि आयुर्वेदात पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या डॉक्टरांनाच या ऑपरेशनची परवानगी असेल.
नेमके कोणते आयुवेर्दिक डॉक्टर आपरेशन करू शकणार याबाबत संभ्रम निर्माण झालेला असताना मंत्रालयाने हे स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानुसार, आयुर्वेदाच्या सर्जरीत पदव्युत्तर पदवी (पीजी) करणाऱ्या डॉक्टरांनाच डोळे, नाक, कान, घसा यासह जनरल सर्जरीसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. या डॉक्टरांना अल्सर, मूत्रमार्गाचे रोग, मोतीबिंदू आदी सर्जरी करण्याचे अधिकार असतील.
आयएमएने केली टीका
n या पार्श्वभूमीवर सेंट्रल काउंसिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम) स्पष्ट केले आहे की, आयुर्वेदिकची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण डॉक्टरांनाच ऑपरेशनबाबतचे प्रशिक्षण दिले जाईल.
n आयुर्वेद महाविद्यालयात पूर्वीपासूनच शल्य आणि शालक्य हे स्वतंत्र विभाग आहेत.
n दरम्यान, या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनने टीका केली आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी म्हटले आहे की, यामुळे खिचडी वैद्यकीय प्रणाली तयार होईल.
n आयुर्वेदिक डॉक्टरांना ऑपरेशनची परवानगी देऊन सरकार देशातील लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे, अशी टीकाही डाॅ. राजन शर्मा यांनी केली आहे.