अयोध्येत फक्त राम मंदिरच, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 06:35 AM2017-11-25T06:35:22+5:302017-11-25T06:36:15+5:30
अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी येथे केले.
उडुपी : अयोध्येतील वादग्रस्त जागेवर केवळ राम मंदिरच उभारण्यात येईल तेथे अन्य काही उभारले जाता कामा नये, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी येथे केले.
विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्म संसदेत हिंदू धर्मातील संत तसेच मठप्रमुख, साधू अशा सुमारे दोन हजार जणांपुढे बोलताना भागवत म्हणाले की, अयोध्येत जे दगड आणण्यात आले आहेत, त्यातूनच आपल्याला राम मंदिर उभारायचे आहे. ते मंदिर उभारले जाईल आणि त्यावर भगवा फडकेल, असा दिवस जवळ आला आहे.
अनेक वर्र्षाची तपश्चर्या, प्रयत्न आणि त्याग या साºयांमुळेच राम मंदिर उभारणे आता शक्य होत आहे. अर्थात हे प्रकरण न्यायालयप्रविष्ट आहे, हेही आपण लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे राम मंदिरासाठी सर्वांनी मिळून जनजागृती करणे आवश्यक आहे, असेही मोहन भागवत यांनी बोलून दाखवले.
>गोहत्याबंदी हवीच
या धर्म संसदेत बोलताना संघप्रमुखांनी देशात संपूर्ण गोहत्याबंदी असायलाच हवी, याचा पुनरुच्चार केला. तीन दिवस चालणाºया या धर्म संसदेत गोरक्षा आणि धर्म परिवर्तन या विषयांवरही चर्चा होणार आहे.