फक्त श्रीमंत आणि प्रसिध्द लोक असहिष्णूतेबद्दल बोलतात - अनुपम खेर
By admin | Published: March 6, 2016 04:29 PM2016-03-06T16:29:43+5:302016-03-06T16:29:43+5:30
या देशातील फक्त श्रीमंत आणि प्रसिध्द लोक असहिष्णूतेबद्दल बोलतात. मात्र गरीबाला त्याच्या उदरनिर्वाहाची, जगण्याची चिंता आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ६ - या देशातील फक्त श्रीमंत आणि प्रसिध्द लोक असहिष्णूतेबद्दल बोलतात. मात्र गरीबाला त्याच्या उदरनिर्वाहाची, जगण्याची चिंता आहे. त्यामुळे त्याला या वादात रस नाही असे मत बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेत अनुपम खेर यांनी व्यक्त केले.
असहिष्णूता हा मुळात चर्चेचा मुद्दाच नाही. फक्त श्रीमंत आणि प्रसिध्द लोक असहिष्णूतेबद्दल बोलतात. तुम्ही रस्त्यावरच्या माणसाला असहिष्णूतेबद्दल विचाराल तर तो असहिष्णूतेबद्दल बोलणार नाही. कारण त्याला दोनवेळच्या जेवणाची चिंता आहे. कोलकात्यात टेलिग्राफच्या कार्यक्रमात बोलताना खेर यांनी हे मत व्यक्त केले.
ज्यांच्या ग्लासामध्ये शॅम्पियन आहे ते फक्त असहिष्णूतेबद्दल बोलतात. तुम्ही भारतात रहाता की, अमेरिकेत ? आणीबाणीच्यावेळी देशात खरी असहिष्णूता होती. तेव्हा तुम्ही सरकार विरोधात बोललात की, तुम्हाला तुरुंगात टाकले जायचे असे खेर म्हणाले.
सोशल मिडियावर सक्रीय असणा-या अनुपम खेर यांनी सहिष्णू-असहिष्णू वादात जाहीरपणे नरेंद्र मोदी सरकारचे समर्थन केले आहे. शाहरुख खान, आमिर खान या आपल्या बॉलिवूडमधल्या सहकलाकारांवरही त्यांनी असहिष्णतूच्या मुद्दावरुन वेळोवेळी कडाडून टीका केली आहे.