कुमार विश्वास भाजपामध्ये जाणार ही फक्त अफवाच
By admin | Published: January 18, 2017 03:03 PM2017-01-18T15:03:25+5:302017-01-18T15:20:41+5:30
आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्य़ाच्या वृत्ताचे खंडण केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. भाजपाप्रवेशाची निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट करत त्यांनी भाजपा आणि प्रसारमाध्यमं तशी अफवा पसरवत असल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे. भाजपाप्रवेशाची बातमी खोटी असल्याची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणाही साधला.
'मला असं समजलय की पंतप्रधान नरेंद्र मोदी टीडीपीमध्ये प्रवेश करणार आहेत. आता ही बातमी म्हणून चालवाल, मी तुमच्यासारखीच मस्करी करत आहे', असं ट्विट करत कुमार विश्वास यांनी भाजपावर कोपरखळी घेतली आहे.
आणखी एका ट्विटमध्ये कुमार विश्वास यांनी भाजपा सरकारवर अफवा पसरवण्याचा आरोप केला आहे. पंजाब-गोवा मध्ये 'आप' दिल्लीतील परिणाम दाखवत आहे. त्यामुळे मोदी या अफवा पसरवण्यात दंग आहे. खोटे पोल, चुकीच्या बातम्या, आणि बिनबुडाचे आरोप करण्यात भाजपा नेते मग्न आहे, असेही विश्वास म्हणाले आहेत.
कुमार विश्वास यांच्या भाजपा प्रवेशाच्या अफवांवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. 'राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली आहे. लवकरच मोदीजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त माझ्याकडे आले आहे', असे उपहासात्मक ट्विट मनिष सिसोदिया यांनी केले आहे.
.@akhileshsharma1@ArvindKejriwal Yes,according to sources PM joining TDP,now run this as a news.Just joking like u guys