Kalicharan Maharaj: भारतात केवळ सनातन धर्म, हिंदूंनी एक होऊन धर्माच्या आधारे मत द्यावं: कालिचरण महाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 01:54 PM2022-05-02T13:54:21+5:302022-05-02T13:55:18+5:30
Kalicharan Maharaj: हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. तसेच धर्माच्या आधारे मतदान केलं पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम ख्रिश्चन हे धर्म नाही, असे विधान कालीचरण महाराज यांनी अलिगडमधील संत समागमामध्ये बोलताने केलं आहे.
लखनौ - हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. तसेच धर्माच्या आधारे मतदान केलं पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम ख्रिश्चन हे धर्म नाही, असे विधान कालीचरण महाराज यांनी अलिगडमधील संत समागमामध्ये बोलताने केलं आहे. दरम्यान, कालिचरण महाराजांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे.
काही महिन्यांपूर्वी कालिचरण महाराजांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे वाद उफाळला होता. त्यानंतर कालिचरण महाराजांवर अटकेची कारवाई झाली होती. दरम्यावन आता कालिचरण महाराजांनी हिंदू राष्ट्रावरून विधान केलं आहे. ते म्हणाले या देशात लाखो मंदिरं तोडली गेली. हजारो महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदू राष्ट्र बनलं नाही, तर हे होतंच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर हिंदू राष्ट्राची स्थापना होऊ शकते. इराक, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसह अनेक देश आपल्या हातून गेले आणि मुस्लिम देश झाले, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. तसेच धर्माच्या आधारे मतदान केलं पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम ख्रिश्चन हे धर्म नाही, असेही त्यांनी म्हटले आहेत. त्यावरून आता वादाला तोंड फुटले आहे.