बडोद्यातील एकमेव मराठी शाळा टिकविण्याची धडपड! विद्यार्थ्यांना रिक्षा भाड्यात सवलत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 03:45 AM2018-02-16T03:45:13+5:302018-02-16T03:45:28+5:30
महाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था ‘दीन’ झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यातील चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल या एकमेव मराठी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी रिक्षा भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.
- प्रज्ञा केळकर-सिंग
महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी (बडोदा) : महाराष्ट्राप्रमाणेच बडोद्यातही मराठी शाळांची अवस्था ‘दीन’ झाली आहे. गेल्या ४-५ वर्षांमध्ये बडोद्यातील चारपैकी तीन मराठी शाळा बंद पडल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या महाराणी चिमणाबाई हायस्कूल या एकमेव मराठी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या टिकवण्यासाठी रिक्षा भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला आहे.
शासनाचे उदासीन धोरण, पालकांचा इंग्रजी माध्यमांकडे वाढत कल या समस्यांचा सामना बडोद्यातील मराठी शाळा करीत आहेत. साडेचार लाखांची मराठी वस्ती असलेल्या बडोद्यामध्ये जेएम ज्युनियर हायस्कूल, महाराणी चिमणाबाई हायस्कूल, एच जे परीख मॉडेल हायस्कूल, महाराणी हायस्कूल फॉर गर्ल्स या चार मराठी शाळा अस्तित्वात होत्या.