शनिवारी केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच बदलता येणार नोटा
By admin | Published: November 18, 2016 09:19 PM2016-11-18T21:19:33+5:302016-11-18T21:31:51+5:30
शनिवारी बँकांमधून केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून मिळतील, अशी माहिती इंडियन बँकिंग असोसिएशनचे चेअरमन राजीव ऋषी यांनी दिली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या घेण्यात घोषणेनंतर गेल्या आठवडाभरापासून सर्वच बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी खातेदारांची प्रचंड गर्दी होत आहे. दरम्यान, अशा परिस्थितीत शनिवारी बँकांमधून केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नोटा बदलून मिळतील, तसेच केवळ खातेदारांनांच आपल्या बॅंकेत व्यवहार करता येतील, अशी माहिती इंडियन बँकिंग असोसिएशनचे चेअरमन राजीव ऋषी यांनी दिली.
एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, ऋषी यांनी बँकांच्या शनिवारच्या वेळापत्रकाची माहिती दिली. "खोळंबून राहिलेली इतर कामे पूर्ण करावयाची असल्याने शनिवारी बँकांमध्ये नोटा बदलण्याचे काम होणार नाही. केवळ ज्येष्ठ नागरिकांना जुन्या नोटा बदलून देण्यात येतील. मात्र नियमित खातेदारांकडून रोख स्वीकारण्याचे आणि देण्याचे काम नियमितपणे सुरू असेल. तसेच नोटा बदलून दिल्यावर बोटाला शाई लावण्याचा निर्णयामुळे बँकांमधील गर्दी 40 टक्क्यांपर्यंत घटली आहे," असे राजीव ऋषी यांनी सांगितले.
Banks tomorrow won't be doing exchange of notes at bank branches, only senior citizen can exchange their notes: Rajiv Rishi, Chairman IBA pic.twitter.com/FHMY3wwgDm
— ANI (@ANI_news) 18 November 2016
All other services at banks will be operational & tomorrow we will complete our pending work: Rajiv Rishi, Chairman IBA pic.twitter.com/y06hABLmdT
— ANI (@ANI_news) 18 November 2016
Using indelible ink reduced queues substantially, it has come down to 40% of what it was initially: Rajiv Rishi, Chairman, Indian Banks Assn pic.twitter.com/ubx5mAAzYa
— ANI (@ANI_news) 18 November 2016