अर्थसंकल्पात नुसतीच शेरो शायरी - राहुल गांधींची टीका
By admin | Published: February 1, 2017 02:32 PM2017-02-01T14:32:03+5:302017-02-01T14:32:03+5:30
वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात नुसतीच शेरोशायरी होती. शेतकरी, तरुण वर्गासाठी या अर्थसंकल्पातून
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात नुसतीच शेरोशायरी होती. शेतकरी, तरुण वर्गासाठी या अर्थसंकल्पातून काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावर केली
आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यावर राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर टीकास्र सोडले. ते म्हणाले, "अरुण जेटलींच्या अर्थसंकल्पात नुसतीच शेरोशायरी होती. पण शेकऱ्यांसाठी, तरुणांसाठी काहीच मोठी घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात काहीतरी धडाकेबाज घोषणा होतील अशी आम्हाला अपेक्षा होती. पण हा तर फुसका बार निघाला." मात्र राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीत पारदर्शकता आणण्यासाठी सरकार काही प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ असेही राहुल गांधी यांनी सांगितले
Sher o shayari ka budget hai, kisaano ke liye kuch nahi kia,yuvaon ke liye kuch nahi kiya: Rahul Gandhi pic.twitter.com/SLBzJfH7zI
— ANI (@ANI_news) February 1, 2017
We were expecting fireworks, instead got a damp squib: Rahul Gandhi on #Budget2017pic.twitter.com/dUlGCWty9s
— ANI (@ANI_news) February 1, 2017