तामीळनाडूमध्ये आता ड्रेस कोड असेल तरच मंदिरात प्रवेश
By Admin | Published: December 21, 2015 05:02 PM2015-12-21T17:02:19+5:302015-12-21T17:06:21+5:30
नविन वर्षात तामीळनाडू राज्यातील मंदिरात प्रवेश करणा-या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या नविन नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला मंदिरात कसल्याही प्रकारचे
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २१ - नविन वर्षात तामीळनाडू राज्यातील मंदिरात प्रवेश करणा-या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या नविन नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला मंदिरात कसल्याही प्रकारचे कपडे घालून जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, त्यांना मंदिरात पादत्राणे घालण्यासही मज्जाव करण्यात येणार आहे.
येत्या एक जानेवारीपासून भाविकांना आता एक प्रकारचा ड्रेस कोड तयार करण्यात आला असून हा ड्रेस कोड पुरुषांसह महिला आणि मुलांनाही लागू करण्यात येणार आहे. यामध्ये पुरुष भाविकांसाठी धोती आणि पायजमा, फॉरमल पॅन्ट आणि शर्ट असा पेहराव घालावा लागणार आहे. तर महिलांसाठी साडी आणि मुलांसाठी संपूर्ण अंग झाकलेले कपडे घालावे लागणार आहेत.
दरम्यान, यासंदर्भात राज्यातील काही मंदिरांबाहेर नोटीस बोर्ड लावण्यात आले आहेत. या बोर्डवर भाविकांना सूचना करण्यात आल्या असून यामध्ये मंदिरात प्रवेश करताना लुंगी, जीन्स आणि इतर काही अनुचित कपडे परिधान करुन येऊ नये असे लिहिले आहे.