... तरच नक्षलवाद्यांशी चर्चा - गृहमंत्री
By admin | Published: September 13, 2014 02:14 AM2014-09-13T02:14:16+5:302014-09-13T02:14:16+5:30
माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, ते शस्त्रे खाली ठेवणार असतील तरच सरकारची वाटाघाटीची तयार असेल
नवी दिल्ली : माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा, ते शस्त्रे खाली ठेवणार असतील तरच सरकारची वाटाघाटीची तयार असेल, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी केले. पोलीस दलांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यासंबंधी आदेश सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
रालोआ सरकारने शंभर दिवस पूर्ण केल्यानिमित्त पत्रपरिषदेत ते बोलत होते. त्यांनी पाकिस्तानशी चर्चा, सीमा आणि अंतर्गत सुरक्षा, व्हिसा नियमन यासारख्या विविध मुद्यांना हात घातला. डावे दशतवादी हिंसाचाराचा मार्ग सोडणार असतील तरच त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी ठामपणे बजावले. हिंसाचाराचा मार्ग सोडणाऱ्या प्रत्येकाशी चर्चेची आमची तयारी असेल. आम्ही वाटाघाटीची तयारी दर्शविली आहे, असे ते म्हणाले. रालोआ सरकारच्या काळात १३२ नक्षलवादी शरण आले असून गेल्यावर्षाच्या याच काळाच्या तुलनेत ३०० टक्के वाढ आहे. नक्षलग्रस्त भागात २१९९ मोबाईल टॉवर्स उभारले जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)