चार महिन्यात फक्त तीन तक्रारी
By admin | Published: November 19, 2015 12:10 AM2015-11-19T00:10:11+5:302015-11-19T00:10:11+5:30
व्हॉटस् ॲप तक्रारीला प्रतिसादच नाही: नियंत्रण कक्षाच्या सीआरओंकडे आहे स्मार्ट फोन
Next
व हॉटस् ॲप तक्रारीला प्रतिसादच नाही: नियंत्रण कक्षाच्या सीआरओंकडे आहे स्मार्ट फोन जळगाव: सीसीटीएनएसच्या माध्यमातून जिल्ातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी मोठा गाजावाजा करून ऑगस्ट महिन्यात नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत जिल्हा नियंत्रण कक्षात स्मार्ट फोनच्या माध्यमातून व्हॉटस् ॲपवर तक्रारींची सुविधा उपलब्ध करुन दिली. मात्र नागरिकांचा प्रतिसाद न मिळणे असो की ही यंत्रणा हाताळण्यात उदासिनता यामुळे चार महिन्यात फक्त तीनच तक्रारी दाखल झाल्या. सावदा येथील एका नागरिकाने फैजपूर उपअधीक्षकांच्या बाबतीत तर जळगाव शहरातील मेहरुण तलावात कार बुडाल्याचा संदेश प्राप्त झाला होता. तसेच जळगाव शहरातील आणखी एक तक्रार दाखल झाली होती. गेल्या तीन दिवसापासून पोलीस महासंचालकांच्या नावाने राज्यातील नियंत्रण कक्षाचे व्हॉटस् ॲप क्रमांक सोशल मीडियावर फिरत आहेत. जिल्ात त्याची अंमलबजावणी चार महिन्याआधीच सुरू झाली आहे. अशी आहे संकल्पना कायदा व सुव्यवस्था असो अथवा अन्य पोलीस व जनतेला संदेश द्यायचा असेल तर पोलीस अधीक्षक हे नियंत्रण कक्षात सीआरओंना संदेश पाठवतील. तेथून हा संदेश जिल्ातील सर्व अपर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांच्या मोबाईलवर जाईल. ते प्रभारी अधिकारी आपआपल्या कार्यक्षेत्रातील बीट प्रमुखाला संदेश फॉरवर्ड करतील. त्यानंतर बीट प्रमुख त्यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस पाटलांना हा संदेश देतील व पोलीस पाटील हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील.एखाद्या गावात काही गैरप्रकार, वादविवाद व कायदा सुव्यवस्था धोक्यात येवू शकते असा प्रकार घडल्यास पोलीस पाटील तो संदेश त्याच पध्दतीने बीट अंमलदाराकडे पाठवेल. तेथून टप्प्याटप्प्याने काही मिनिटातच हा संदेश थेट नियंत्रण कक्ष व पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहचेल. जिल्ातील सामान्य नागरिक त्याची तक्रार या व्हॉटस् अप क्रमांकावर करू शकतो.