सभापती-उपसभापतींना एकच वाहन

By admin | Published: July 12, 2015 09:58 PM2015-07-12T21:58:19+5:302015-07-12T21:58:19+5:30

इगतपुरी : चालक नसल्याने पदाधिकार्‍यांची गैरसोय

The only vehicle for the chairman-deputy speaker | सभापती-उपसभापतींना एकच वाहन

सभापती-उपसभापतींना एकच वाहन

Next
तपुरी : चालक नसल्याने पदाधिकार्‍यांची गैरसोय
इगतपुरी : इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतींना गेल्या १५ दिवसांपासून हक्काच्या वाहनाविना ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. सभापती उपसभापती यांच्यासह गटविकास अधिकारी या कारणाने त्रस्त झाले आहेत. वाहन आहे पण वाहकच नसल्याने संपूर्ण प्रशासन कात्रीत सापडले आहे.
दुसरीकडे सात महिन्यांपासून निर्लेखित झालेल्या वाहनाच्या प्रस्तावाला जिल्हा परिषदेने केराची टोपली दाखविली आहे. पदाधिकार्‍यांना तालुक्याचा गाडा हाकतांना मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत.
इगतपुरी पंचायत समितीमध्ये दोन वाहने कार्यरत होती, यापैकी एक वाहन जीर्ण होऊन वापरायोग्य नसल्याने त्याचा निर्लेखन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सात महिन्यांपूर्वी सादर करण्यात आला आहे. ‘ा वाहनाचे वाहकही त्या कारणाने प्रतिनियुक्तीवर तालुक्याबाहेर कार्यरत झाले आहेत.
पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, यांच्यासह गटविकास अधिकार्‍यांकडे सध्या एकच वाहन आहे. परंतु त्या वाहनाचे चालक सेवानिवृत्त झाल्याने वाहनास कोणी चालवावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी वाहक नसल्याने सभापती गोपाळा लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंघसे यांच्यासह गटविकास अधिकारी किरण कोवे याना तालुक्याचा कामकाज पाहता येत नसल्याने अडचणीत सापडले आहेत. दरम्यान निर्लेखित वाहनाबाबत आणि पालकाबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय न घेतल्याने अडचणी वाढणार आहेत.
तालुक्यातील ग्रामपंचायती, अंगणवाड्या, आरोग्य केंद्र शाळा आदिंमध्ये पदाधिकार्‍यांससह, बीडीओंकडे वाहनच नसल्याने भेटी देता येत नाही. परिणामी मोठ्याप्रमाणावर अनागोंदी वाढली आहे. याबाबत तातडीने निर्णय न घेतल्यास पदाधिकारी आक्रमक होऊन कामकाजावर बहिष्कार टाकतील असा इशारा सभापती गोपाळा लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंघसे यांनी दिला आहे.
कोट
१) गेल्या ३ वर्षापासून गाड्यांचा प्रश्न अनुत्तरीत अहे. १४ वर्षाच्या गाड्या झाल्याने नेहमी नादुरुस्त राहतात वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार करुनही प्रशासन भिख घालत नाही. आम्ही तालुक्याचा गाढा कसा हाकलायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गोपाळा लहांगे
सभापती पंचायत समिती इगतपुरी
२) सेवानिवृत्त वाहक झाल्यानंतर प्रशासनाने कार्यवाही करुन लगेच पर्याय उभा केला असता मात्र ढिम्म कारभारामुळे पदाधिकार्‍यांना काम करण्यास अडचणी निर्माण होत आहेत वाहकाची व्यवस्था व वाहन व्यवस्था न केल्यास आक्रमक भुमिका घेऊन कामकाजावर सर्व सदस्य बहिष्कार टाकू
पांडुरंग वारुंघसे
उपसभापती

Web Title: The only vehicle for the chairman-deputy speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.