‘चर्चा हाच संघर्ष मिटविण्याचा मार्ग’
By admin | Published: September 3, 2015 10:11 PM2015-09-03T22:11:24+5:302015-09-03T22:11:24+5:30
संघर्ष मिटविण्यासाठी केवळ चर्चा हाच एकमेव मार्ग आहे आणि विचारधारांनी अशा चर्चेचा मार्ग दाखविली पाहिजे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनेत्तर
नवी दिल्ली : संघर्ष मिटविण्यासाठी केवळ चर्चा हाच एकमेव मार्ग आहे आणि विचारधारांनी अशा चर्चेचा मार्ग दाखविली पाहिजे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनेत्तर तत्त्व जगाचा मोठा भूभाग नियंत्रित करून क्रूर हिंसाचार घडवून आणत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
‘असहिष्णू शासनेत्तर तत्त्वांनी (नॉन-स्टेट अॅक्टर्स) जगाचा मोठा भूभाग आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि ते निष्पाप लोकांवर क्रूर हिंसाचार करीत आहेत. आमच्या संघर्ष मिटविणाऱ्या प्रक्रियेच्या निश्चितपणे काही मर्यादा आहेत आणि त्या अधिकाधिक स्पष्ट होत आहेत. त्यामुळे जग आता बौद्ध धर्माची दखल घेत असल्याबद्दल आश्चर्य वाटायला नको,’ असे कोणत्याही देशाचा नामोल्लेख न करता पंतप्रधानांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)