ओ.पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश

By Admin | Published: August 23, 2016 06:13 PM2016-08-23T18:13:50+5:302016-08-23T18:13:50+5:30

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओ.पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे.

O.P. Order to investigate allegations made by Jaysha | ओ.पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश

ओ.पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 -  रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला मॅरेथॉन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ओ.पी. जैशाने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दोन सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. 
रिओ ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन स्पर्धेच्यावेळी आमच्यासाठी ना पाणी होते, ना एनर्जी ड्रिंक होते. केवळ एकदा ८ किलोमीटर अंतरावर रिओ आयोजकांतर्फे मला पाणी मिळाले. त्याची काही मदत झाली नाही. सर्व देशांचे दोन किलोमीटर अंतरावर स्टॉल होते, पण आपल्या देशाचा स्टॉल रिकामा होता, असा आरोप ओ.पी. जैशा हिने केला आहे. 
दरम्यान, ओ.पी. जैशा हिने केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दोन सदस्सीय समितीची निवड केली आहे. यामध्ये ओंकार केडीया आणि विवेक नारायण यांचा समावेश आहे. तसेच, ही दोन सदस्सीय समिती येत्या सात दिवसांत यासंदर्भात अहवाल सादर करणार आहे. 
 

 

Web Title: O.P. Order to investigate allegations made by Jaysha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.