श्रीनगरमधील खुल्या बाजारात पुन्हा गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 04:50 AM2019-11-25T04:50:16+5:302019-11-25T04:50:42+5:30
धमक्यांची भित्तीपत्रके लागल्यामुळे काश्मीरच्या बहुतेक भागांत दुकाने बंद ठेवणे भाग पडल्यानंतर चार दिवसांनी रविवारी येथील खुल्या बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी झाली
श्रीनगर : धमक्यांची भित्तीपत्रके लागल्यामुळे काश्मीरच्या बहुतेक भागांत दुकाने बंद ठेवणे भाग पडल्यानंतर चार दिवसांनी रविवारी येथील खुल्या बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काश्मीर खोºयात श्रीनगरमधील सिव्हिल लाईन्स भागासह काही ठिकाणी दुकाने उघडली. मिनी बसेसनी श्रीनगरमध्ये फेºया मारल्या व लाल चौक या व्यावसायिक भागाच्या परिसरात काही दुकाने उघडली गेली होती. तथापि, श्रीनगरमधील जुन्या भागातील बहुतेक दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद होती.
२० नोव्हेंबर रोजी दुकाने बंद ठेवा व सार्वजनिक वाहतुकीची वाहने चालवू नका, अशा धमक्या देणारी भित्तीपत्रके लागल्यानंतर पुन्हा घाबरून दुकाने बंद ठेवली गेली होती. पोलिसांनी या भित्तीपत्रकांची दखल घेऊन अनेक लोकांना अटक केली आहे.