चुकून महिलेच्या खात्याशी आधार लिंक, 1 लाख काढले; मजूर म्हणतो, 'मला वाटलं मोदी पैसे पाठवतात'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:49 PM2023-03-29T12:49:41+5:302023-03-29T12:50:45+5:30

एका विडी कामगाराचा आधार क्रमांक एका महिलेच्या बँक खात्याशी चुकून लिंक झाला. यानंतर मजूर त्या खात्यातून पैसे काढून खर्च करत राहिला

open secret on complaint said i thought prime minister was sending money where to return now | चुकून महिलेच्या खात्याशी आधार लिंक, 1 लाख काढले; मजूर म्हणतो, 'मला वाटलं मोदी पैसे पाठवतात'

चुकून महिलेच्या खात्याशी आधार लिंक, 1 लाख काढले; मजूर म्हणतो, 'मला वाटलं मोदी पैसे पाठवतात'

googlenewsNext

झारखंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विडी कामगाराचा आधार क्रमांक एका महिलेच्या बँक खात्याशी चुकून लिंक झाला. यानंतर मजूर त्या खात्यातून पैसे काढून खर्च करत राहिला. दोन वर्षांत त्याने खात्यातून एक लाखाहून अधिक रक्कम काढली. हा प्रकार महिलेच्या लक्षात येताच तिने बँक मॅनेजरकडे तक्रार केली. तपासाअंती 42 वर्षीय मजुराचं नाव जीतराय सामंत असून त्याला 24 मार्च रोजी अटक करण्यात आली. 

मजुराला पैसे का काढले, असे विचारले असता तो म्हणाला, "मला वाटले पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या खात्यात पैसे पाठवत आहेत. आता पैसे परत करू शकत नाही. आम्ही तेवढे सक्षम नाही." ही घटना झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जीतराय सामंत यांचे आधार दुसऱ्या महिलेच्या खात्याशी लिंक झाले. जीतराय कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये गेले तेव्हा त्यांना कळले की, त्यांचं आधारशी लिंक केलेले खातं आहे, ज्यामध्ये पैसे आहेत. 

सामंत यांनी पैसे काढणे सुरूच ठेवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक कर्मचारीही मजुराला पैसे काढण्यासाठी मदत करत होता. ज्या महिलेचे खाते सामंत यांच्या आधारशी लिंक करण्यात आले होते. तिचे नाव लागुरी आहे. तिच्या खात्यातून हळूहळू पैसे गायब होत असल्याचे लक्षात येताच तिने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झारखंड राज्य ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाकडे तक्रार केली. व्यवस्थापकाने अधिकाऱ्यांना पत्र लिहून चूक लक्षात आल्यावर सामंत यांच्याकडून रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले. 

सामंत पैसे देऊ शकले नाहीत. त्याच्याविरुद्ध ऑक्टोबरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. मजुराने सांगितले की, सप्टेंबर महिन्यात बँकेने माझे आधार चुकीच्या खात्याशी लिंक केल्याची माहिती दिली. तसेच मला एक लाख रुपये परत करावे लागतील असेही सांगितले. सामंत यांनी आपल्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. ज्या अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे चुकीचे आधार लिंकिंग झाले, त्यांच्यावर कारवाई करावी, असेही सांगितले. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: open secret on complaint said i thought prime minister was sending money where to return now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.