भारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकचा डाव उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 03:08 AM2019-03-03T03:08:07+5:302019-03-03T03:08:44+5:30

दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Opening Pakistan's game to poison Indian soldiers | भारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकचा डाव उघड

भारतीय जवानांवर विषप्रयोग करण्याचा पाकचा डाव उघड

Next

नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात कमालीचे तणावाचे वातावरण असतानाच, आत दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी पाकिस्तानातील आयएसआय या गुप्तहेर संघटनेतर्फे भारतीय जवानांच्या धान्यात विष कालवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पाकिस्तानी लष्कर व आयएसआय मिळून दहशतवाद्यांच्या साह्याने भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन साठ्यांमध्ये विष कालवून कालवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यासाठी काश्मीरमधील आपल्या एजंटांचा वापर करण्याचा आयएसआयचा प्रयत्न आहे. हा कट उघडकीस येताच, संरक्षण दलाने व भारतीय गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व ठिकाणी रेशनचे साठे नीट ठेवावेत, त्यावर लक्ष ठेवावे, त्यांची वाहतूक करताना तसेच ते वाहनांत चढवताना व उतरवताना विशेष लक्ष ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)
>महत्त्वाच्या ठिकाणांवर लक्ष
भारतीय गुप्तहेर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह देशाच्या अनेक शहरांतील महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांच्या निशाणावर आहेत. दिल्लीत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही रेल्वेगाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. रेल्वे स्टेशनांवर ड्रोनद्वारेही नजर ठेवण्यात येत आहे.

Web Title: Opening Pakistan's game to poison Indian soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.