Operation All Out : अनंतनागमध्ये लष्कराकडून चार दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 10:36 AM2018-06-22T10:36:07+5:302018-06-22T13:41:26+5:30
ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर लष्कराने शुक्रवारी सकाळी अजून चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र केल्यानंतर लष्कराने शुक्रवारी सकाळी अजून चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफारा भागात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीमध्ये लष्कराने या चार दहशतवाद्यांना ठार केले असून, या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे, तर दोन नागरिक जखमी झाले आहेत.
जम्मू काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी या चकमकीविषयी माहिती देताना सांगितले की, या परिसरात तीन ते चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर पहाटेपासून या चकमकीस सुरुवात झाली. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले असून, या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याला वीरमरण आले आहे. तसेच दोन नागरिक जखमी झाले आहेत."
Encounter started in early hours of the morning, there was information of 3-4 terrorists' presence. 3 bodies (of terrorists) are being retrieved. 1 Policeman is reportedly martyred & 2 civilians are injuries: J&K DGP S.P. Vaid on encounter underway in Anantnag's Srigufwara pic.twitter.com/HrxmS3nMDo
— ANI (@ANI) June 22, 2018
रमजानचा महिना आटोपल्यावर शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर तसेच जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर लष्कराच्या दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला अधिकच धार आली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफारा परिसरात दहशतवादील लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी लष्कराने शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना घेरले. त्यानंतर सुरू झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना ठार केले.
#FLASH: 2 terrorists gunned down by security forces in an encounter underway in Anantnag's Srigufwara area, another terrorist trapped. #JammuAndKashmirpic.twitter.com/rXYj9Dg5RJ
— ANI (@ANI) June 22, 2018
दरम्यान, पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे दोन दिवसांपूर्वीच लष्कर आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यांच्याकडून एके-47 आणि अन्य दारुगोळा जप्त करण्यात आला होता.