Operation All Out : कुपवाडामधील चाद्दर परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एकाचे आत्मसमर्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 04:50 PM2018-06-24T16:50:55+5:302018-06-24T20:00:12+5:30
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील चाद्दर परिसरात लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील चाद्दर परिसरात लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले आहे. दहशतवाद्यांनी लष्कराच्या गस्तीपथकावर हल्ला केल्यानंतर या चकमकीस सुरुवात झाली होती. दरम्यान, या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याच्या वृत्तास जम्मू काश्मीरचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी दुजोरा दिला आहे.
"Reportedly two terrorists killed so far," tweets J&K DGP Shesh Paul Vaid on encounter between security forces and terrorists in Chadder area. #JammuAndKashmir (File pic) pic.twitter.com/moruNbE7yJ
— ANI (@ANI) June 24, 2018
रविवारी सकाळी लष्कराचे गस्तीपथक कुलगाममधील चाद्दर परिसरातून जात असताना दहशतवाद्यांनी या पथकावर हल्ला केला. त्यानंतर लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरुवात झाली. दोन्ही बाजूंनी तुफान गोळीबार सुरू होता. अखेर दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कराचा यश आले. ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाचा डिव्हिजनल कमांडर शकूर डार याचाही समावेश आहे. तसेच चकमकीनंतर एका दहशतवाद्याने लष्करासमोर आत्मसमर्पण केले.
An operation was launched in J&K's Kulgam earlier today during which two top LeT terrorists were killed and one terrorist was arrested who had laid down his arms: SP Pani, IGP Kashmir on Kulgam encounter pic.twitter.com/LfXkWodd6l
— ANI (@ANI) June 24, 2018
या चकमकीनंतर कुलगाममधील इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली आहे. याआधी शुक्रवारी अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफारा भागात ही चकमक झाली होती. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता.
Internet services suspended in Kulgam district after encounter between security forces and terrorists in Chadder area. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) June 24, 2018