Operation Lotus: भाजपाकडून आणखी एका राज्यात ऑपरेशन लोटसची तयारी? नेत्याच्या दाव्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:35 PM2023-04-12T15:35:40+5:302023-04-12T15:36:42+5:30

BJP Operation Lotus: मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्यापासून भाजपाने विविध राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस राबवून सत्तांतर घडवून आणलं आहे. दरम्यान, आता आणखी एका राज्यात भाजपा ऑपरेशन लोट्स राबवणार का, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Operation Lotus: Preparation of operation lotus from BJP in Himachal Pradesh? Excitement by the leader's claim | Operation Lotus: भाजपाकडून आणखी एका राज्यात ऑपरेशन लोटसची तयारी? नेत्याच्या दाव्याने खळबळ 

Operation Lotus: भाजपाकडून आणखी एका राज्यात ऑपरेशन लोटसची तयारी? नेत्याच्या दाव्याने खळबळ 

googlenewsNext

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता आल्यापासून भाजपाने विविध राज्यांमध्ये ऑपरेशन लोटस राबवून सत्तांतर घडवून आणलं आहे. दरम्यान, आता आणखी एका राज्यात भाजपा ऑपरेशन लोट्स राबवणार का, अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. हिमाचल प्रदेशमधील भाजपाचे आमदार इंद्र सिंह गांधी यांनी पुन्हा एकदा ऑपरेशन लोट्सचा राग आळवला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनंतर ऑपरेशन लोट्स राबवलं जाईल आणि जयराम ठाकूर राज्याचे मुख्यमंत्री बनतील, असा दावा इंद्र सिंह गांधी यांनी केला  आहे.

इंद्रसिंह गांधी यांनी याआधीही ऑपरेशन लोट्सचा दावा केला होता. त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होईल. ते म्हणाले की, मेडिकल कॉलेज नेरचौककडून आउटसोर्स कर्मचाऱ्यांना बाहेरची वाट दाखवून प्रदेश सरकारने या आरोग्य संस्थेमध्ये अव्यवस्थेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांनी सांगितलं की, प्रस्तावित आंतरारष्ट्रीय बल्ह एअरपोर्टचा विरोध करणारे तेच दलाल आहेत. ज्यांनी आधी बल्हमध्ये होणाऱ्या विविधा विकास कार्यांचा विरोध केला होता.

इंद्रसिंह गांधी यांनी सांगितले की, जर आजच्या तारखेला विधानसभा निवडणुका झाल्यास हिमाचल प्रदेशमधील ६८ पैकी ६० जागा भाजपा जिंकेल. तर ८ जागांवर काँग्रेसला विजय मिळेल. त्यांनी सांगितले की, ओल्ड पेन्शन स्कीममध्ये अनेक स्लॅब असतात. मात्र आतापर्यंत प्रदेश सरकार ओल्ड पेन्शन स्कीम बहाल करण्याबाबत आपली बाजू स्पष्ट करू शकत नाही आहे.

त्यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाकडून कर्मचाऱ्यांसोबत करण्यात आलेली थट्टा हा आता त्यांच्याच गळ्याचा फास बनली आहे. प्रदेशातील मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदार यांच्याकडून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. प्रदेश सरकारने बदल्याच्या राजकारणामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांनाही सोडलेलं नाही. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या दूरदूरपर्यंत करण्यात आल्या आहेत.  

Web Title: Operation Lotus: Preparation of operation lotus from BJP in Himachal Pradesh? Excitement by the leader's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.