ऑपरेशन प्रहार-३ : सुकमा हल्ल्यातील मास्टरमाईंड हिडमासह हे आठ नक्षल कमांडर सुरक्षा दलांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 05:31 PM2021-04-05T17:31:36+5:302021-04-05T17:46:28+5:30

Sukma Naxal Attack: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात सुमारे २२ जवानांना वीरमरण आल्याने नक्षल प्रभावित क्षेत्रात वावरणारी सुरक्षा दले आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला मोठा धक्का बसला आहे.

Operation Prahar-3: These eight Naxal commanders, including the mastermind of the Bijapur attack, are on the radar of the security forces. | ऑपरेशन प्रहार-३ : सुकमा हल्ल्यातील मास्टरमाईंड हिडमासह हे आठ नक्षल कमांडर सुरक्षा दलांच्या रडारवर

ऑपरेशन प्रहार-३ : सुकमा हल्ल्यातील मास्टरमाईंड हिडमासह हे आठ नक्षल कमांडर सुरक्षा दलांच्या रडारवर

Next

नवी दिल्ली - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात (Sukma Naxal Attack) नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यात सुमारे २२ जवानांना वीरमरण आल्याने नक्षल प्रभावित क्षेत्रात वावरणारी सुरक्षा दले आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला मोठा धक्का बसला आहे. बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हल्ला करून केलेल्या जीवितहानीकडे सुरक्षा दले आणि गृहमंत्रालय नामुष्की म्हणून पाहत असून, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नक्षलवाद्यांविरोधात एक मोठे अभियान चालवण्याच्या मोहिमेची तयारी झाली आहे. या मोहिमेमध्ये नक्षलवाद्यांच्या काही टॉप कमांडरही सुरक्षा दलांच्या रडारवर असतील. त्यामध्ये बिजापूर नक्षली हल्ल्यामधील एक मास्टरमाईंड असलेला हिडमा याचाही समावेश असेल. (Operation Prahar-3, These eight Naxal commanders, including the mastermind of the Bijapur attack, are on the radar of the security forces.)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाहा  यांनी नक्षलवाद्यांविरोधातील अभियानाला गती देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच तसेच त्यासाठी ह्युमन इंटेलिजेन्स आणि टेक्निकल इंटेलिजेन्सची मदत घेतली जाईल. एवढेच नाही तर आता व्यापक पातळीवर एनटीआरओ सुरक्षा यंत्रणांना रियल टाइम माहिती देऊन मदत करेल. 

सुरक्षा यंत्रणा मोस्ट वाँटेड नक्षलवाद्यांच्यी यादी बनवून त्यांच्याविरोधात लवकरच मोठी कारवाई सुरू करणार आहेत. सूत्रांनी सांगितले की, ऑपरेशन प्रहार-३ च्या अंतर्गत तरुणांचे ब्रेनवॉश करून आपल्या बाजूने वळवणाऱ्या नक्षलवाद्यांना लक्ष्य करण्यात येणार आहे. त्यासाठी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर्सची यादी बनवण्यात आली आहे. यामध्ये पीएलजीए-१ चा सर्वात मोठा कमांडर हिडमा याचा समावेश आहे. त्याच्यासोबत कमलेश उर्फ लछू, साकेत नुरेटी, लालू दंडामी, मांगेसग गोंड, राम जी, सुखलाल आणि मलेश यांचा समावेश आहे.  

दरम्यान, शनिवारी ३ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर झालेल्या मोठ्या नक्षलवादी हल्ल्यामध्ये २२ जवानांचा मृत्यू झाला होता. पैकी २१ जवानांचे मृतदेह हे रविवारी सापडले होते. 

Web Title: Operation Prahar-3: These eight Naxal commanders, including the mastermind of the Bijapur attack, are on the radar of the security forces.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.