‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’कडे काँग्रेससह विरोधकांच्या प्रचार मोहिमेचे सारथ्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:47 AM2017-10-26T04:47:56+5:302017-10-26T04:48:19+5:30

नवी दिल्ली : गुजरातच्या प्रचारात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून काँग्रेसने २0१९ च्या लोकसभा निवडणुकांचीही जोरदार तयारी चालवली आहे.

Opinion Opinion Campaign with Congress 'Data Analytics'? | ‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’कडे काँग्रेससह विरोधकांच्या प्रचार मोहिमेचे सारथ्य?

‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’कडे काँग्रेससह विरोधकांच्या प्रचार मोहिमेचे सारथ्य?

Next

सुरेश भटेवरा 
नवी दिल्ली : गुजरातच्या प्रचारात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून काँग्रेसने २0१९ च्या लोकसभा निवडणुकांचीही जोरदार तयारी चालवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह देशांतील निवडणुकांमधे लक्षवेधी विजयश्री खेचून आणण्यास कारणीभूत ठरलेल्या केंब्रिज अ‍ॅनालिटिक्स कंपनीकडे काँग्रेससह संयुक्त विरोधी पक्षांच्या आघाडीच्या रणनीतीचे काम सोपविण्याची चर्चा सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे कळते. केंब्रिज अ‍ॅनालिटिक्सचे संस्थापक अलेक्झांडर या शक्यतेला अंतिम रूप देण्यासाठी गेल्या तीन
महिन्यांत दोनदा भारत दौ-यावर आले.
आॅगस्टमध्ये राहुल गांधींसह निवडक काँग्रेस नेत्यांसमोर त्यांनी संकल्पनेचे सादरीकरणही केले. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची रणनीती ठरविण्याचे काम या कंपनीला सोपविल्यास भारताच्या राजकीय समरांगणात प्रथमच विदेशी कंपनीचा सहभाग पाहायला मिळेल.
अलेक्झांडर यांच्या दौºयात काँग्रेस नेत्यांबरोबर झालेल्या बैठकांत एकमत झाले आहे. केंब्रिजची मोठी टीम त्यासाठी भारतात तळ ठोकणार आहे. तथापि, उभयतांमधे औपचारिक करार अद्याप झालेला नाही. याची दोन कारणे आहेत. केंब्रिजने आंतरराष्ट्रीय स्तरानुसार खर्चाच्या आकड्याचा जो प्रस्ताव काँग्रेसपुढे ठेवला आहे, त्यासाठी काँग्रेसला आणखी काही वेळ हवा आहे. गुजरात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर व काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधींकडे आल्यानंतरच त्या अंतिम रूप दिले जाईल, असा अंदाज आहे.
>४0 निवडणुकांचा अनुभव
ट्रम्प यांच्या प्रचाराची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही लक्षवेधी मोहीम चालवून, केंब्रिज अ‍ॅनालिटिक्सने सा-या जगाचे लक्ष वेधून घेतले. शिवाय विरोधकांचा डेटा डिकोड करून आक्रमक रितीने असा हल्ला चढवला की, विरोधकांना बॅकफूटवर यावे लागले. विविध प्रकारचे डेटा डिकोड करून माहितीच्या मुळाशी जाऊन, त्याचे वास्तव मांडण्यात केंब्रिजचा हातखंडा आहे, असे मानले जाते. जगातल्या ४0 पेक्षा अधिक निवडणुकांत केंब्रिजने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

Web Title: Opinion Opinion Campaign with Congress 'Data Analytics'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.