साध्वींच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

By admin | Published: December 3, 2014 01:33 AM2014-12-03T01:33:38+5:302014-12-03T01:33:38+5:30

केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधक आक्रमक बनले असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रथमच सरकारची संसदेत कसोटी लागणार आहे.

Opponent aggressive against Sadhvi's resignation | साध्वींच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

साध्वींच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Next

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधक आक्रमक बनले असून त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून प्रथमच सरकारची संसदेत कसोटी लागणार आहे.
साध्वींनी संसदेत माफी मागितली आणि लोकसभेचे कामकाज सुरळीत झाले मात्र सरकारचे संख्याबळ कमी असलेल्या राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले. साध्वींच्या विधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी कमालीचे नाराज झाले असून त्यांनी देशाला संबोधित करण्याचे काम तुम्ही करू नका, यापुढे अशा प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराच पक्षखासदारांना दिला आहे. पंतप्रधानांच्या निवेदनामुळे विरोधकांची नाराजी कमी झालेली नाही. विरोधकांना राज्यसभेत एकवटण्याची संधीही यानिमित्ताने मिळाली आहे. राज्यसभेतील अल्पमत विचारात घेत अरुण जेटली यांनी साध्वी निरंजन ज्योती यांना माफी मागायला लावली. साध्वींनी लोकसभेतही माफी मागत या प्रकणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
विरोधक एकवटले...
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने संसदेत आणि बाहेर निदर्शने करीत आक्रमकता दाखविली असतानाच समाजवादी पक्ष, बसपा, संजद, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि अन्य पक्षांची एकजूट झाल्याचे दिसून आले. राज्यसभेत विरोधक भक्कम झाल्याचे दिसून आले. साध्वींनी राजीनामा दिल्याखेरीज सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
संतापजनक विधान
तुम्हाला रामजाद्यांचे सरकार हवे की हरामजाद्यांचे असे विधान साध्वींनी दिल्लीत प्रचारसभेत केले होते.
साध्वींनी गुन्हा केला असून याप्रकरणी तपास पूर्ण होईपर्यंत त्या मंत्रिपदावर कायम राहू शकत नाही, असे माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी म्हटले. साध्वींनी संसदेत कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. बाहेर केलेल्या विधानाबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे, असे सांगत जेटलींनी विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
> दिल्लीकरांनी मत देताना ‘रामाचा सुपुत्र ’आणि ‘अनौरस’ यापैकी एकाची निवड करावी, असे वक्तव्य साध्वींनी केले होते. लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांनी ज्योती यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला़ तसेच ज्योती यांना बडतर्फ करण्याची मागणी लावून धरली़ या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले़

> लोकसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत कार्यस्थगनाचा प्रस्ताव मांडला़ मंत्र्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आहे़ देशात जातीय तणाव असताना एका जबाबदार मंत्र्यांने असे वक्तव्य करणे गैर आहे़ याबाबत त्यांनी माफी मागावी, असे ते म्हणाले़ पण लोकसभाध्यक्षांनी कार्यस्थगनाचा प्रस्ताव नामंजूर केला़ बसपा प्रमुख मायावती व माकपा नेते सीताराम येचुरी यांनी साध्वी निरंजन ज्योतींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली़

Web Title: Opponent aggressive against Sadhvi's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.