विरोधकांची सरकारवर टीका
By admin | Published: September 20, 2016 05:50 AM2016-09-20T05:50:02+5:302016-09-20T05:50:02+5:30
उरीमधील हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- उरीमधील हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्यानंतर मोदी सरकारच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अद्याप तरी सरकारला यावर उपाय शोधता आलेला नाही, तर काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष्य केले आहे. याशिवाय सरकारमधील सहभागी शिवसेनेनेही सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसच्या काळापेक्षाही आता परिस्थिती अधिक बिघडल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
काँग्रेसने मोदी यांना त्यांच्या त्या विधानाची आठवण करून दिली आहे. एका शिराच्या बदल्यात दहा शिर आणणारे आणि ज्यांची छाती ५६ इंचाची आहे ते आता कोठे आहेत? एकानंतर एक हल्ले होत आहेत आणि सरकारवर त्याचा काही परिणाम होत नाही.असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मोदी यांनी याबाबत जबाबदारी निश्चित करावी. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भूमिकाही स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मनीष तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांना सवाल केला आहे की, ते देशाला विश्वास देऊ शकतात का की, यापुढे देशावर कोणताही अतिरेकी हल्ला होणार नाही.
पाकिस्तानबाबत सरकारचे काय
धोरण आहे, हे सरकारने जाहीर करावे, मसूदला सोडले नसते तर जैश- ए- मोहम्मदसारखी संघटना उभी राहिली नसती.डावे पक्ष, राजद, जेडीयूसह अन्य पक्षांनी उरीप्रकरणी मोदी सरकारला दोषी ठरविले.
काँगे्रसचे नेते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, मोदी सरकार आल्यापासून ९०० पेक्षा अधिक वेळा युद्धविरामचे उल्लंघन झाले आहे.
हे तर गुप्तचर विभागाचे अपयश आहे आणि जर सरकारला याची माहिती होती तर तात्काळ पावले का उचलण्यात आली नाहीत. या सैनिकांच्या हालचालींची माहिती कोणी लीक केली?