जगभरात ज्यांचं कौतुक होतंय, त्यांच्यावरच विरोधक टीका करताहेत; जावडेकरांचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 06:31 PM2020-05-30T18:31:18+5:302020-05-30T18:33:59+5:30

कधी म्हणतात, लॉकडाऊन योग्य वेळी लागू झाले नाही. तर लॉकडाऊनमधून सूट दिल्यावरही त्यांना पोटशूळ उठतो.

Opponents criticize those who are admired all over the world; Javdekar's on Congress vrd | जगभरात ज्यांचं कौतुक होतंय, त्यांच्यावरच विरोधक टीका करताहेत; जावडेकरांचा काँग्रेसला टोला

जगभरात ज्यांचं कौतुक होतंय, त्यांच्यावरच विरोधक टीका करताहेत; जावडेकरांचा काँग्रेसला टोला

Next

नवी दिल्लीः ज्यांच्या कामाचं संपूर्ण जग कौतुक करतो, त्यांच्यावरच विरोधक त्यावर टीका करतात, असं म्हणत जावडेकरांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. आजतकच्या ई-अजेंडा कार्यक्रमात ते बोलत होते. लॉकडाऊनचा निर्णय नियोजन न करता घेण्यात आला, असा विरोधकांकडून होत असलेल्या आरोपासंदर्भात विचारले असता, जावडेकर म्हणाले, जर आज लॉकडाऊन नसते तर संक्रमित रुग्णांची संख्या 50 लाखांच्या घरात गेली असती. ही एक संकटाची परिस्थिती आहे, तरीही या काळात आपण केलेल्या कार्याचे संपूर्ण जगाने कौतुक केले आहे. पण आपले विरोधक फक्त टीका करण्यात धन्यता मानत आहेत. कधी म्हणतात, लॉकडाऊन योग्य वेळी लागू झाले नाही. तर लॉकडाऊनमधून सूट दिल्यावरही त्यांना पोटशूळ उठतो.

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचा योग्य वेळी निर्णय घेतला. जनतेला अपील केले. त्यांच्या या निर्णयाचे जगाने कौतुक केले. आमचे सरकार सतत काम करत आहे. कोरोनाचे संकट जगभर आहे. कोरोनाची लोकांमध्ये सर्वप्रथम चर्चा केली जात आहे. मोदीजींनी यापूर्वी कोरोनाचं संकट ओळखलं होतं, म्हणूनच त्या संकटाला आपण योग्य पद्धतीनं सामोरे गेलो आहोत. 

प्रकाश जावडेकर म्हणाले की, चार महिन्यांपूर्वी जेव्हा कोरोना आला, तेव्हा देशात फक्त प्रयोगशाळा होती. आज आपल्याकडे 100 पेक्षा जास्त प्रयोगशाळा आहेत. आज आपल्याकडे 800 कोरोना समर्पित रुग्णालये आहेत. तसेच भारतानं आत्मनिर्भर होत व्हेंटिलेटर बनविण्यास सुरुवात केली आहे,  पीपीई किट्स आम्ही बनवत आहोत. जगाच्या तुलनेत भारताचे झालेले नुकसान फारच कमी आहे. मोदींनी केलेल्या आवाहनाला जनतेने पाठिंबा दर्शविला. मोदींच्या मेक इन इंडिया प्रोग्रामला चालना मिळाली. सगळे जण एकत्र आले आणि शेतीपासून संरक्षणापर्यंत बरीच सुधारणा झाली. हे सर्व बदल कोरोना विषाणूमुळे झाल्याचंही जावडेकरांनी अधोरेखित केलं. 

हेही वाचा!

CoronaVirus: स्मशानात मृतदेहाला पाणी पाजणं पडलं महागात; अंत्यविधीला गेलेल्या १९ जणांना कोरोनाचा संसर्ग 

CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार

जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्यास सरकारची परवानगी, पण 'हे' नियम पाळावे लागणार 

CoronaVirus: विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ठोस तोडगा काढण्याचे निर्देश

CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...

Web Title: Opponents criticize those who are admired all over the world; Javdekar's on Congress vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.