काश्मिरी तरुणांना रोजगारासाठी बीपीओ, स्थानिक काश्मिरी, हिंदी भाषेतही संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:47 AM2018-02-12T00:47:32+5:302018-02-12T00:48:01+5:30
काश्मीरमधील तरुणांना नोकरी व रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आपल्या बीपीओ योजनेला गती देण्याचा निश्चय केला आहे.
संतोष ठाकूर
नवी दिल्ली : काश्मीरमधील तरुणांना नोकरी व रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आपल्या बीपीओ योजनेला गती देण्याचा निश्चय केला आहे. सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच बीपीओ सुरू करण्यात आले आहेत. त्यात ३६९ जागा असून त्याद्वारे एक हजारपेक्षा जास्त तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. काही ठिकाणी सेवा सुरुही झाली असून इतर ठिकाणी ती सुरू करण्याची तयारीही होत आहे. काही बीपीओ असे आहेत की तेथे तुरुणांना स्थानिक काश्मिरी भाषेत रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, श्रीनगरमध्ये दोन व जम्मूत दोन ठिकाणी बीपीओ योजनेअंतर्गत १६४ जागांना मान्यता दिली गेली आहे. प्रत्येक बीपीओंत ठराविक संख्येत सरकारकडून जागा स्वीकृत केल्या जातात व त्यानुुसार बीपीओ सुरू करणाºया कंपनीला सरकारकडून अनुदान मिळते. प्रसाद म्हणाले की, या दोन्ही ठिकाणी सुरू झालेल्या चार बीपीओंत जास्त जागा काश्मीरमध्येआहेत. काश्मीरमध्ये एक बीपीओत ६० तर दुसºया ठिकाणी ७५ जागा आहेत. जम्मूत एक बीपीओत चार तर इतर ठिकाणी २५ जागा आहेत.