पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध विरोधक सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:00 AM2021-06-02T06:00:46+5:302021-06-02T06:01:41+5:30

तातडीने चुका दुरुस्त करण्याची मागणी : लक्ष्य आगामी विधानसभा निवडणूक

Opposition active against Amarinder Singh in Punjab | पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध विरोधक सक्रिय

पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध विरोधक सक्रिय

Next

- व्यंकटेश केसरी

नवी दिल्ली : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या विरोधकांनी पक्षश्रेष्ठींवर तातडीने सुधारणांची पावले उचला, असा दबाव आणायला सुरुवात केल्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीत अमरिंदर सिंग यांना मोकळेपणाने काम करता येण्याची शक्यता कमी दिसते. याचा अर्थ बंडखोर नवज्योत सिंग सिद्धू यांचे पुनर्वसन आणि आगामी निवडणुकीत उमेदवारांची निवड तसेच निर्णयप्रक्रियेत अमरिंदर सिंग यांच्याविरोधातील गटाला सामावून घेतले जाण्याची शक्यता फेटाळता येत नाही. 

पंजाब काँग्रेस आणि सरकारवर सप्ततारांकित नेते (सेव्हन स्टार लीडर्स), बाहेरील आणि समाजकंटकांच्या जवळ असलेल्या लोकांचा प्रभाव आहे,” असा आरोप पंजाब प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभेचे विद्यमान सदस्य समशेर सिंग धिल्लो यांनी मंगळवारी केला. मल्लिकार्जुन खरगे, जे. पी. अग्रवाल आणि हरीश रावत यांचा समावेश असलेली अखिल भारतीय काँग्रेस समितीची उच्चाधिकार समिती राज्यातील काँग्रेस नेत्यांना नवी दिल्लीत भेटत आहेत. अमरिंदरसिंग हे आगामी निवडणूक लढवणार नाहीत, असे गृहीत धरण्यात आले असतानाही निवडणुकीत लढाईचे नेतृत्व करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्यानंतर बंडखोर सक्रिय झाले.

चुकीचा संदेश
निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांना मुख्यमंत्री सिंग यांनी दिलेल्या जबाबदारीबद्दल विचारले असता धिल्लो म्हणाले, “निवडणूक जाहीरनाम्याची अमलबजावणी न केल्यामुळे प्रशांत किशोर यांना तोंड दाखवायला जागा नाही.” 
मंत्रिमंडळ पुनर्रचना आणि सिद्धू यांना क्रमांक दोनचा नेता म्हणून समोर आणले जात असल्याबद्दल धिल्लो यांनी “बाहेरील लोक जे महत्त्व मिळवत आहेत त्यातून निष्ठावंत आणि तळागाळात काम करणाऱ्यांना चुकीचा संदेश जात आहे,” असे सांगितले.

Web Title: Opposition active against Amarinder Singh in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Punjabपंजाब