नागरिकत्व कायद्याचा निषेध करणारे विरोधी पक्ष दलितविरोधी-जगतप्रकाश नड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 02:30 AM2019-12-30T02:30:38+5:302019-12-30T02:30:58+5:30
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे दलित समाजातील ७० ते ८० टक्के लोकांना फायदा होणार
नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे दलित समाजातील ७० ते ८० टक्के लोकांना फायदा होणार आहे. त्यामुळे या कायद्याच्या निषेधार्थ निदर्शने करणारे विरोधी पक्ष हे दलितविरोधी आहेत अशी टीका भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रविवारी केली आहे.
दलित समुदायाच्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दलित समाजाचे सर्वात मोठे संरक्षक आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल काँग्रेस पक्ष खोटीनाटी माहिती पसरवत असून अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करत आहे.
शेजारील तीन राष्ट्रांमध्ये धार्मिक छळाला कंटाळून भारताच्या आश्रयाला आलेल्या निर्वासितांना या कायद्याद्वारे भारताचे नागरिकत्व मिळणार आहे.