नगरपालिकेच्या नवीन विकास आराखड्याला आखाडा परिषदेचा विरोध
By admin | Published: October 7, 2016 01:12 AM2016-10-07T01:12:32+5:302016-10-07T01:37:39+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगर परिषदेने टाउन प्लॅनच्या वतीने त्र्यंबकेश्वर शहरासाठी नवीन तयार केलेल्या विकास आराखड्याला त्र्यंबकेश्वरमधील दहाच्या दहा आखाड्यांनी तीव्र हरकत घेतली असून हा आराखडा रद्द करण्यात यावा आणि सिंहस्थाच्या नावाखाली गावातील रस्ते रुंदीकरण (जे आराखड्यात दर्शविले आहे) तेही रद्द व्हावेत, असा प्रस्ताव येथील षडदर्शन आखाडा परिषदेने केला आहे. ा प्रस्तावाच्या प्रती त्र्यंबक नगर परिषद टाउन प्लॅनिंग नाशिक, नगरविकास मंत्रालय व मुख्यमंत्र्यांना समक्ष भेटून देण्यात येणार आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील षड्दर्शन आखाड्याची बैठक श्रीपंचायती उदासीन (बडा) आखाडा येथे झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती होते. यावेळी दहाही आखाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी उदासीन नया आखाड्याचे महंत जगता मुनी म्हणाले, सिंहस्थाच्या नावाखाली शाही मिरवणुकीसाठी गावातील अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण तीन मीटर धरले असून या नऊ मीटर रस्त्यामुळे गावातील सर्व इमारती ज्या जमीनदोस्त होणार आहेत. सर्व शहरात पडझड होणार आहे. आम्ही आतापर्यंत शाही मिरवणुका केल्या मात्र कुठेही मुख्य रस्त्याने अडचणी भासल्या नाहीत. ज्या अडचणी आल्या त्या संबंधितांनी दूर केल्या; मात्र शाही मार्ग आमच्यासाठी पर्याप्त आहे, पुरेसा आहे. आगामी काळात अडचणी होऊ नये म्हणून जर आराखडा तयार केला असेल तर रिंगरोडने शाही नेण्यास आमची तयारी आहे असेही जगतारमुनी व अन्य महंतांनी सांगितले. सिंहस्थातील विकासाच्या नावाखाली विकास आराखडे यापूर्वी केले, आताही केले यासाठी आखाड्याच्या जमिनी शासनाने घेतल्या आहेत. त्याचा मोबदला तर अद्याप दिला नाहीच, पण आखाड्याच्या जमिनी मात्र बळकावल्या. यास्तव तयार केलेला विकास आराखडा रद्द करण्यात यावा. शहरात कोणतेही फेरबदल करू नये, असे शेवटी निवेदनात व हरकत अर्जात म्हटले आहे. यावेळी जुना आखाडा महंत ठाणापती ओमानंद सरस्वती, महंत सागरानंद सरस्वती-अध्यक्ष, अगनी आखाड्याचे महंत अभयानंद ब्राचारी, महानिर्वाणी आखाड्याचे महंत कलमेशगिरी, निरंजनी आखाडा महंत कुमारगिरी, आनंद आखाडा महंत शंकरानंद सरस्वती, अटल आखाडा महंत उदयगिरी, उदासीन बडा आखाडा महंत बालकमुनी, नया उदासीन आखाडा महंत जगतारमुनी, निर्मल आखाडा महंत राजेंद्रसिंह, गोरक्षनाथमठ योगी, अश्विनीनाथ, योगी यशताप, आखाडा परिषद-प्रवक्ता-महंत बिंदूजी महाराज, जुना आखाडा नीलपर्वत-भानापती-महंत सुखदेवगिरी, महंत सुमेरगिरी, उदासीन बडा सुंदरगिरी, देवीदास, ओमकारगिरी आदि उपस्थित होते.