आंबेडकर विद्यापीठात नरेंद्र मोदींच्या भाषणाच्यावेळी निदर्शने, घोषणाबाजी
By Admin | Published: January 22, 2016 04:28 PM2016-01-22T16:28:56+5:302016-01-22T16:33:49+5:30
भीमराव आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभासाठी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यांचं भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. २२ - भीमराव आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभासाठी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यांचं भाषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. एका विद्यार्थ्याला हॉलच्या बाहेर काढण्यात आले तर काही जणांना सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आहे.
उत्तर प्रदेशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नरेंद्र मोदी स्वत: अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एका वर्षानी निवडणुका असून २० ते २२ टक्के मतदार दलित आहेत. त्यामुळेही दलितांशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये ते उपस्थित राहत असल्याची शक्यता आहे.
आजही भीमराव आंबेडकर विद्यापीठात रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी मोदी काहीतरी बोलतील अशी आशा अनेकांना होती.
दरम्यान, मोदींनी रोहित वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी दु:ख व्यक्त केलं असून भारतमातेनं एक सुपूत्र गमावला असून त्याच्या मातेवर काय वेळ आली असेल अशी भावना व्यक्त केली आहे.
WATCH: Mother India has lost one of her sons, can feel his family's pain, says PM Modi on Rohith Vemula https://t.co/SinNy3r0TG
— ANI (@ANI_news) January 22, 2016