चेन्नईत विरोधकांची तर कोलकात्यात भाजपची रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 05:40 AM2019-12-24T05:40:51+5:302019-12-24T05:41:26+5:30

नागरिकत्व कायद्यावरून राजकारण तापले : चेन्नईमधील रॅलीत स्टॅलिन, चिदम्बरम, वायकोंसह प्रमुख नेत्यांचा सहभाग

Opposition in Chennai and BJP rally in Kolkata | चेन्नईत विरोधकांची तर कोलकात्यात भाजपची रॅली

चेन्नईत विरोधकांची तर कोलकात्यात भाजपची रॅली

googlenewsNext

नवी दिल्ली/चेन्नई/कोलकाता : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात चेन्नईत सोमवारी द्र्रमुक आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी रॅली काढली आणि हा कायदा मागे घेण्याची मागणी केली, तर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात भाजपने मोठी रॅली काढत कायद्याचे समर्थन केले.

द्रमुक आणि सहकारी पक्षांनी असा इशारा दिला की, जर सरकारने हा कायदा मागे घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल. द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी या रॅलीचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम, एमडीएमकेचे प्रमुख वायको व अन्य पक्षांचे नेते होते. कार्यकर्त्यांच्या हातात पक्षाचे झेंडे, बॅनर आणि फलक दिसत होते. तब्बल अडीच किमीपर्यंत ही रॅली चालली. सीएए परत घ्या, धार्मिक भावना भडकावू नका, अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. या कायद्याचे समर्थन करणाऱ्या अण्णाद्रमुकवरही यावेळी टीका करण्यात आली. द्रमुकचे असे म्हणणे आहे की, हा कायदा मुस्लिमविरोधी आणि श्रीलंकेतील तामिळींच्या विरोधात आहे. या रॅलीच्या पार्श्वभूमीवर ५ हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता.

जामियातील आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलन सोमवारी आठव्या दिवशीही सुरूच होते. शेकडो लोक विद्यापीठाबाहेर रस्त्यांवर आंदोलन करीत होते. नूर नगर, बाटला हाऊस आणि ओखलाच्या अनेक विद्यार्थ्यांनी सोमवारी या आंदोलनात सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी असा सवाल केला आहे की, जर मुस्लिम, ख्रिश्चन आणि अन्य अल्पसंख्याक बाहेरील आणि अवैध प्रवासी आहेत, तर केंद्र सरकार किती डिटेंशन सेंटर उभारणार आहे? त्यांनी असाही आरोप केला आहे की, पंतप्रधानांना पोलीस दलाबाबत अचानक प्रेम वाटू लागले आहे.

जामियातील एक विद्यार्थी आशिष झा म्हणाला की, एक महिन्यापूर्वी जेव्हा न्यायालय परिसरात पोलिसांना मारहाण झाली होती तेव्हा या सरकारने एकही प्रकरण दाखल केले नाही. तेव्हा त्यांना पोलिसांबाबत प्रेम नव्हते. आता जेव्हा पोलीस जामिया, एएमयू आणि अन्य विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना मारहाण करीत आहेत, तर ते पोलिसांना शहीद संबोधत आहेत. उत्तर प्रदेशात जिवास मुकलेल्या विद्यार्थ्यांचे आणि अन्य लोकांचे काय? उत्तर प्रदेशात पोलिसांनी केलेल्या कारवाईविरुद्ध नवी दिल्लीतील उत्तर प्रदेश भवनच्या बाहेर सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी हे विद्यार्थी करीत होते.

पोलीस पिस्तूल लोड करीत असल्याचा व्हिडिओ
च्आंदोलकांवर गोळीबार केला नाही, असा दावा पोलीस करीत असले तरी कानपूरमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, यात असे दिसत आहे की, एक उपनिरीक्षक पिस्तूल लोडिंग करत आहे. ९० सेकंदांच्या या व्हिडिओत खाकी पोशाखातील पोलीस दिसत आहे.
च्हा व्हिडिओ यतीमखाना भागातील आहे, असा अंदाज आहे. एडीजी प्रेम प्रकाश आणि आयजी मोहित अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की, पोलिसांनी गोळीबार केला नाही.

‘सीएएशी संबंधित मीडिया कॅम्पेन थांबवा’
च्सीएएशी संबंधित सर्व मीडिया कॅम्पेन थांबवा, असे निर्देश कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत. मुख्य न्यायाधीश टीबीएन राधाकृष्णन आणि न्या. अरिजित बॅनर्जी यांच्या खंडपीठाने अंतिम आदेशापर्यंत सर्व प्रकारचे अभियान थांबविण्यास सांगितले आहे.
च्सार्वजनिक पैशांचा उपयोग सीएएच्या विरुद्ध अभियानासाठी केला जात आहे, या याचिकाकर्त्यांच्या दाव्यावरही न्यायालयाने राज्य सरकारला विस्तृत उत्तर मागविले आहे.

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय हितापेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले - नड्डा

च्कोलकाता : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत तृणमूल काँग्रेस लोकांची दिशाभूल करीत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नेहमीच राष्ट्रीय हितापेक्षा राजकारणाला प्राधान्य दिले, असे मत भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केले.
च्नव्या कायद्याच्या समर्थनार्थ पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांसोबत नड्डा यांनी एक मोर्चा काढला.

च्त्यानंतर रॅलीला संबोधित करताना नड्डा म्हणाले की, हा कायदा नागरिकत्व देतो. हिरावून घेत नाही. तृणमूल काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष या कायद्यावरून लोकांची दिशाभूल करीत आहे. ते केवळ आपली वोट बँक सुरक्षित करण्यासाठी त्रस्त आहेत.
च्नड्डा म्हणाले की, आमच्या देशात मुस्लिम लहानाचे मोठे झाले; पण पाकिस्तानात हिंदूंंना द्वेषाचा सामना करावा लागला. नव्या कायद्यानुसार पाकिस्तानातून आलेल्या बिगर मुस्लिम व्यक्तीला अटी पूर्ण केल्यानंतर नागरिकत्व दिले जाईल.

Web Title: Opposition in Chennai and BJP rally in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.