आधारसक्तीस काँग्रेसचा विरोध

By admin | Published: March 28, 2017 01:50 AM2017-03-28T01:50:23+5:302017-03-28T01:50:23+5:30

प्राप्तिकराचे रीटर्न भरण्यासाठी ‘आधार’ची सक्ती केली जाण्यास काँग्रेसने सोमवारी राज्यसभेत विरोध केला

Opposition to the Congress | आधारसक्तीस काँग्रेसचा विरोध

आधारसक्तीस काँग्रेसचा विरोध

Next

नवी दिल्ली : प्राप्तिकराचे रीटर्न भरण्यासाठी ‘आधार’ची सक्ती केली जाण्यास काँग्रेसने सोमवारी राज्यसभेत विरोध केला व वित्त विधेयकाच्या रूपाने ही दुरुस्ती करून सरकारने या वरिष्ठ सभागृहाची मुस्कटदाबी केल्याचा निषेध केला.
माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल या विषयावर बोलताना म्हणाले की, अशा प्रकारे ‘आधार’च्या सक्तीचे भयंकर गंभीर परिणाम होऊ शकतात.
‘आधार’ची माहिती हॅक करून लोकांच्या बँक खात्यांमध्ये परस्पर व्यवहार केले जाऊ शकतात. लोकांच्या प्रवासाचा तपशील मिळवून त्यांचा मागोवा घेतला जाऊ शकतो. अमेरिकेत पेन्टॅगॉनचा (तेथील संरक्षण मंत्रालय) डेटा हॅक होऊ शकतो, तर इथे ‘आधार’चा डेटा कशावरून हॅक होणार नाही, असा त्यांनी सवाल केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

घोटाळा तुम्ही देशाच्या माथी का मारत आहात?
भाजपा विरोधी पक्षात होती तेव्हा त्यांनी ‘आधार’ला कसून विरोध केला होता, याचे स्मरण देत सिब्बल वित्तमंत्री जेटली यांना उद्देशून म्हणाले की, ‘आधार’ हा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचे तुमच्या एका बड्या नेत्याने त्या वेळी म्हटले होते. तसे आहे तर आता हा घोटाळा तुम्ही देशाच्या माथी का मारत आहात?

Web Title: Opposition to the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.