तोंडी तलाकला केंद्राचा विरोध
By admin | Published: October 8, 2016 05:57 AM2016-10-08T05:57:29+5:302016-10-08T05:57:29+5:30
तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट देण्याच्या पद्धतीला केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला.
Next
नवी दिल्ली : तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट देण्याच्या पद्धतीला केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात विरोध दर्शवला. ही पद्धत धर्माचा महत्त्वाचा भाग असू शकत नाही, असे केंद्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
लैंगिक समानता व महिलांचा आत्मसन्मान यांच्याशी तडजोड शक्यच नाही, असे मतही केंद्राने व्यक्त केले. कोणत्याही धर्मातील महिलेचे हक्क व तिच्या आशाआकांक्षांच्या आड धार्मिक प्रथांचा अडथळा यायला नको, असे केंद्राने म्हटले आहे. तोंडी बोलून घटस्फोट घेणे हा वैयक्तिक कायदा असून त्यात सुधारणा शक्य नसल्याचा युक्तिवाद मुस्लीम लॉ बोर्डाने केला होता. (वृत्तसंस्था)