विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 05:43 PM2018-10-02T17:43:04+5:302018-10-02T17:44:44+5:30

राम मंदिरासाठी संघ आणि भाजपा कटिबद्ध असल्याचं भागवत म्हणाले

opposition parties can not oppose construction of ram temple in ayodhya says rss chief mohan bhagwat | विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत- मोहन भागवत

विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत- मोहन भागवत

हरिद्वार: देशातील बहुसंख्य समाज भगवान रामाची पूजा करत असल्यानं विरोधकही राम मंदिराला विरोध करू शकत नाहीत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघ आणि भाजपा अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहेत. मात्र काही गोष्टींसाठी वेळ लागतो, असं भागवत म्हणाले. पतंजली योगपीठात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

प्रत्येक सरकारच्या काही सीमा असतात, असं मोहन भागवत यांनी म्हटलं. 'प्रत्येक सरकारच्या काही मर्यादा असतात. त्या मर्यादांमध्ये राहूनच त्यांना काम करावं लागतं. मात्र संत आणि पुरोहित यांना अशा कोणत्याही मर्यादा नसतात,' असं सरसंघचालक म्हणाले. 'विरोधी पक्षदेखील उघडपणे अयोध्येतील राम मंदिराला विरोध करु शकत नाही. कारण देशातील बहुसंख्य समाज हा भगवान रामाची पूजा करतो, याची त्यांना कल्पना आहे. मात्र काही गोष्टींसाठी वेळ लागतो. राम मंदिराची उभारणी नक्की होईल. पण त्यासाठी काही अवधी लागेल,' असं भागवत यांनी म्हटलं. 

यावेळी सरसंघचालकांनी सरकारच्या मर्यादांवरदेखील भाष्य केलं. 'प्रत्येक सरकारच्या काही मर्यादा असतात. त्यामध्ये राहून सरकारचं काम चालतं. चांगलं काम करणारा पक्ष सत्तेत असायला हवा. कोण सत्तेत आहे, हे अतिशय महत्त्वाचं असतं,' अशा शब्दांमध्ये भागवत यांनी अप्रत्यक्षपणे सरकारचं समर्थन केलं. यावेळी रामदेव बाबा यांनी संत-महंत मंत्र्यांपेक्षा अधिक सक्षम असल्याचं प्रतिपादन केलं. 'ज्या ठिकाणी मंत्री, धनाढ्य व्यक्ती अपयशी ठरतात, त्याठिकाणी संत-महंतांना यश मिळतं. अनेकदा हे दिसून आलं आहे,' असं रामदेव बाबांनी म्हटलं. 
 

Web Title: opposition parties can not oppose construction of ram temple in ayodhya says rss chief mohan bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.