विरोधकांनी २0१९ची निवडणूक विसरूनच जावी - अब्दुल्ला
By admin | Published: March 12, 2017 01:08 AM2017-03-12T01:08:10+5:302017-03-12T01:08:10+5:30
उत्तर प्रदेशातील भाजपाचा विजय म्हणजे छोट्या डबक्यातील तरंग नसून त्सुनामी आहे. विरोधी पक्षांनी आता २0१९ची सार्वत्रिक निवडणूक विसरूनच जावी, आता थेट
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील भाजपाचा विजय म्हणजे छोट्या डबक्यातील तरंग नसून त्सुनामी आहे. विरोधी पक्षांनी आता २0१९ची सार्वत्रिक निवडणूक विसरूनच जावी, आता थेट २0२४च्या निवडणुकीची तयारी करावी, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केले.
ट्विटची एक मालिका पोस्ट करून ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, २0१९मध्ये मोदींचा सामना करू शकेल असा अखिल भारतीय पातळीवर स्वीकारार्हता असलेला नेताच विरोधी पक्षांकडे नाही. या स्थितीत आम्हाला २0१९ची निवडणूक विसरावी लागू
शकते. २0२४च्या निवडणुकीची तयारी केलेली बरी.
ओमर यांनी म्हटले की, सर्वच तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या नजरेतून उत्तर प्रदेशातील लाट कशी काय निसटली? हे काही छोट्या डबक्यातील तरंग नव्हते. ती त्सुनामी होती. पंजाब, गोवा आणि मणिपूर येथील निकालांवरून हे स्पष्ट दिसते की, भाजपा पराभूत करता येण्याजोगा नाही. त्यामुळे आता केवळ टीका न करता सकारात्मक पर्याय देण्याचे धोरण ठरवावे लागेल. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, मी यापूर्वीही बोललो होतो, आता पुन्हा सांगतो की, लोकांना पर्यायी अजेंडा द्यावा लागेल. आम्ही काय चांगले करू शकतो यावर तो आधारित असला पाहिजे.