विरोधकांकडून समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न – नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 04:36 PM2018-06-28T16:36:43+5:302018-06-28T16:36:57+5:30
सध्या देशात महापुरुषांच्या नावावरून राजकारण सुरू आहे. विरोधकांकडून महापुरुषांच्या नावाचा उपयोग समाजांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
नवी दिल्ली- सध्या देशात महापुरुषांच्या नावावरून राजकारण सुरू आहे. विरोधकांकडून महापुरुषांच्या नावाचा उपयोग समाजांमध्ये वितुष्ट निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. उत्तर प्रदेशातील मगहर येथे संत कबीर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
फुले, गांधी आणि डॉ. आंबेडकर समाजात समानता टिकून राहावी, यासाठी प्रयत्नशील होते. बाबासाहेबांनी देशाच्या संविधानातून सगळ्यांना समानतेचा अधिकार बहाल केला. परंतु देशात असे काही पक्ष आहेत ते अशांतता नांदावी, यासाठी प्रयत्न करत असतात. यावेळी मोदींनी आणीबाणीवरून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. गांधी कुटुंबीयांनी स्वतःच्या फायद्याचंच राजकारण केल्याची टीकाही मोदींनी केली.
There are some parties which do not want peace & development but unrest. They think if there will be unrest, they will be politically benefitted. Such people are cut off from their roots. They don't know the nature of this nation of Sant Kabir, Mahatma Gandhi & Baba Ambedkar: PM pic.twitter.com/UGddbJdtol
— ANI UP (@ANINewsUP) June 28, 2018
मगहर येथे पोहोचल्यानंतर मोदी यांनी संत कबीर यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. संत कबीर यांची आज 620वी पुण्यतिथी आहे. संत कबीर यांनी समाजाला दिशा देण्याचं काम केल्याचा उल्लेखही यावेळी मोदींनी केला आहे.