तोंडाच्या कर्करोगाने दर सहा तासांत एक मृत्यू
By admin | Published: July 22, 2014 12:20 AM2014-07-22T00:20:39+5:302014-07-22T08:42:48+5:30
दर सहा तासांमागे तोंडाच्या कर्करोगाने पीडित एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची माहिती इंडियन डेंटल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी दिली आहे.
Next
कोलकाता : देशातील कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला अधोरेखित करताना, दर सहा तासांमागे तोंडाच्या कर्करोगाने पीडित एका व्यक्तीचा मृत्यू होत असल्याची माहिती इंडियन डेंटल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. अशोक ढोबळे यांनी दिली आहे. ही उदाहरणो कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे संकेत देणारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अनेक प्रकरणांमध्ये रोगाचे निदानच होत नसल्याने ही स्थिती अधिक गंभीर होण्याचे भयही त्यांनी व्यक्त केले.
ग्रामीण व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमध्ये या आजाराची व त्याने होणा:या मृत्यूची नोंद राखणो अवघड असल्याकडे लक्ष वेधून डॉ. ढोबळे यांनी, सिगारेट व तंबाखूच्या वाढत्या सेवनामुळे भारतात मागील दशकात तोंडाच्या कर्करोगपीडितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे
म्हटले.
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये तोंडाच्या कर्करोग्यांचे प्रमाण 4क् टक्के असून ते पूवरेत्तर राज्यांमध्ये अधिक आढळत असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली. याचसोबत प. बंगाल, अांध्र प्रदेश, गुजरात व तामिळनाडूसारखी राज्येही या आजाराने ग्रासलेली आहेत. या राज्यांमधील प्रत्येक तिस:या व्यक्तीला तंबाखूचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे.
दंतवैद्य हा तोंडाचा कर्करोग झालेल्या व्यक्तीला तपासणारा पहिला व्यक्ती असतो. त्यामुळे त्यांनी केवळ दातांपुरतीच आपली तपासणी मर्यादित ठेवू नये. ती तोंड, जीभ, तोंडाचा आतील भाग, हिरडय़ा
यांचीही करावी असे आवाहन त्यांनी पुढे केले.
तोंडाचा कर्करोग हा जर पहिल्याच टप्प्यात ओळखता आला तर तो पूर्णपणो बरा केला जाऊ शकतो; मात्र तो दुस:या टप्प्यात गेला तर
रुग्णाच्या आयुष्यातील किमान
पाच वर्षे कमी झालेली असतात,
अशी माहिती त्यांनी पुढे दिली. (वृत्तसंस्था)
4या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी, तंबाखूच्या केवळ काही उत्पादनावरच र्निबध घालणो हा उपाय नसून, तंबाखूच्या सर्वच उत्पादनांवर बंदी आणली पाहिजे, असे मत त्यांनी पुढे व्यक्त केले; मात्र तंबाखूच्या उद्योगात असलेल्या मोठय़ा कामगारसंख्येमुळे ते अवघड आहे.
4सरकारने त्यांना दुसरी कामे दिली तरच तंबाखूवर पूर्णपणो बंदी घालता येणो शक्य असल्याचे मत डॉ. ढोबळे यांनी व्यक्त केले.