कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 08:36 AM2020-05-16T08:36:55+5:302020-05-16T08:42:22+5:30

हवामान खात्याने अनेक ठिकाणी  ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. खराब हवामानामुळे हा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

orange alert issued due to cyclonic storm amphon SSS | कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

Next

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देश सध्या कोरोना संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान देशाला चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. 'अम्फान' (Amphan) असं या चक्रीवादळाचं नाव असून यामुळे अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी (16 मे) बंगालच्या उपसागरात अम्फान हे चक्रीवादळ वादळ येण्याची शक्यता आहे. अम्फानमुळे अंदमान निकोबार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहू शकतात.

अंदमान आणि निकोबार मुसळधार पाऊस पडेल. त्याशिवाय ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अनेक ठिकाणी  ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. खराब हवामानामुळे हा इशारा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तसेच पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश यासह काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

The monsoon will arrive in Kerala on June 5 this year; Forecast by the observatory | मॉन्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर पाच जूनला आगमन होणार ; वेधशाळेने वर्तवला अंदाज  

हवामान खात्याच्या वतीने मच्छीमारांना बंगालच्या उपसागराच्या दक्षिण आणि मध्य भागात समुद्रात जाऊ नका असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच समुद्राच्या या भागात गेलेल्या मच्छिमारांनाही त्वरित परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळ वादळाच्या वातावरणाबाबतही अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात पुढील 2-3 दिवस मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

नैॠत्य मॉन्सूनची सुरुवात पाच जूनपासून होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 5 जुन या दिवशी केरळच्या किनारपट्टीवर मॉन्सुनचे आगमन होणार असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. यावर्षी केरळच्या किनारपट्टीवर येण्यास नैॠत्य मॉन्सूनला मागील वषीच्या तुलनेत थोडा विलंब झाला आहे. यावेळी तो पाच जुनच्या वेळी दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनच्या आगमन कालावधीमध्ये बदल झाला आहे. यामध्ये एक आठवड्याचे अंतर निर्माण झाले आहे. 

दक्षिण बंगालचा उपसागर दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन होण्यास ही स्थिती निर्माण होणार आहे. साधारण दीर्घकालीन वेळेनुसार मॉन्सून 20 मे पर्यंत अंदमान - निकोबार बेटांवर दाखल होऊन बहुतांशी भाग व्यापतो. मागील वर्षी 18 मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता. तर संपूर्ण अंदमान बेटे  व्यापण्यास 30 मे पर्यंत वाट पाहावी लागली होती. तसेच यावर्षी नैॠत्य मोसमी वाऱ्याच्या (मॉन्सुन) हंगामात जुन ते सप्टेंबर या कालावधीत यंदा शंभर टक्के पाऊस पडण्याचा अंदाज विभागाने यापूर्वी जाहीर केला आहे. त्यात पाच टक्के कमी अधिक पाऊस पडण्याची शक्यता गृहित धरण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया

CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट

CoronaVirus News : ... म्हणून कोरोनाला रोखण्यात 'हे' 18 देश ठरले यशस्वी

CoronaVirus News : '...म्हणून भारताची भूमिका महत्त्वाची'; मोदींसोबतच्या चर्चेनंतर बिल गेट्स यांचं ट्विट

प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी

CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण

CoronaVirus News : पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिल गेट्स यांच्याशी खास चर्चा; म्हणाले..

Web Title: orange alert issued due to cyclonic storm amphon SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.