कोर्टाचा आदेश पाळू- पीडीपी

By admin | Published: March 10, 2015 11:38 PM2015-03-10T23:38:13+5:302015-03-10T23:38:13+5:30

दहशतवाद आणि विघटनवाद खपवून न घेण्याचे आमचे धोरण असून अशा मुद्यांवर मवाळ भूमिका अवलंबली जाणार नाही,

Order the court order - PDP | कोर्टाचा आदेश पाळू- पीडीपी

कोर्टाचा आदेश पाळू- पीडीपी

Next

नवी दिल्ली/जम्मू : दहशतवाद आणि विघटनवाद खपवून न घेण्याचे आमचे धोरण असून अशा मुद्यांवर मवाळ भूमिका अवलंबली जाणार नाही, असे स्पष्ट करीत भाजपने विरोधाचा सूर भक्कम केला असतानाच पीडीपीने आम्ही राजकीय कैद्यांची मुक्तता करण्याबाबत केवळ न्यायालयांच्या आदेशाला बांधील राहू, असे ठणकावले आहे.
विघटनवादी नेता मसरत आलम याच्या सुटकेपासून जम्मू-काश्मीर सरकारमध्ये युती पक्ष असलेल्या पीडीपी-भाजपचे संबंध ताणले गेले असतानाच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गाझियाबाद येथे बोलताना आमच्यासाठी युतीचे सरकार नव्हे, तर देशाची सुरक्षा सर्वोच्च असल्याचे स्पष्ट केले. आमचे सरकार कोणत्याही किमतीत देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही. देशाची सुरक्षा हीच आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी सोमवारी संसदेतही हीच भूमिका स्पष्ट केली आहे, असे ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) ४६ व्या स्थापनादिनाच्या पार्श्वभूमीवर येथे एका कार्यक्रमात म्हणाले.

Web Title: Order the court order - PDP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.