पत्नीने मद्यपान करावे म्हणून पती न्यायालयात, पुरुषाच्या घरातील मंडळींचाही आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 04:34 AM2019-06-29T04:34:33+5:302019-06-29T04:35:16+5:30

पती दारू पितो, अशी अनेक महिलांची तक्रार असते. पतीच्या या व्यसनामुळे अनेक जणी घटस्फोटासाठीही अर्ज करतात; पण...

In order to drink alcohol to wife, husband in court | पत्नीने मद्यपान करावे म्हणून पती न्यायालयात, पुरुषाच्या घरातील मंडळींचाही आग्रह

पत्नीने मद्यपान करावे म्हणून पती न्यायालयात, पुरुषाच्या घरातील मंडळींचाही आग्रह

Next

भोपाळ  - पती दारू पितो, अशी अनेक महिलांची तक्रार असते. पतीच्या या व्यसनामुळे अनेक जणी घटस्फोटासाठीही अर्ज करतात; पण आपली पत्नी दारू पीत नाही, तिला मद्यपान करायला सांगा, अशी विनंती मध्यप्रदेशातील एका पुरुषाने भोपाळच्या कुटुंब न्यायालयात केल्याने तेथील कायदेशीर सल्लागारही चकित झाले आहेत.

या दाम्पत्याच्या विवाहाला १० वर्षे होऊ न गेली आहेत. त्यांना तीन मुले असून, सर्वात मोठे मूल ९ वर्षांचे आहे. अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातील हा पुरुष खासगी कंपनीत नोकरी करतो; पण आपल्या पत्नीने मद्यपान करावे, असा त्याचा आग्रह आहे. आपले वडील, आई, भाऊ , आत्या, मामा व तसेच चुलत भाऊ असे सारेच जण मद्यपान करतात, त्यामुळे पत्नीनेही मद्यपान करायला हवे, असे त्या पुरुषाचे म्हणणे आहे.

त्याच्या घरातील सर्वांच्या मद्यपानाला पत्नीने कधीही विरोध केला नाही; पण कौटुंबिक समारंभ वा पार्टीमध्ये ती ज्यूस पीत
असे.
दोघांचा विवाह झाल्यापासून पतीने तिला मद्यपानासाठी आग्रह चालवला होता; पण तिने सातत्याने नकारच दिला. आता मात्र प्रकरण हातघाईला आले आहे.
तिने मद्यपान करावे, यासाठी तो करीत असलेल्या आग्रहाचा तिला त्रास व्हायला लागला आहे. आमच्या घरात कोणीच दारू पीत नव्हते आणि नाही. त्यामुळे मला ते आवडत नाही आणि माझ्या मुलांनीही कधी मद्यपान करू नये, असे माझे म्हणणे आहे, असे पत्नीचे म्हणणे आहे.
सुरुवातीला तो मद्यपानासाठी आग्रह करायचा वा कौटुंबिक समारंभात मद्यपान असायचे, तेव्हा ती मुलांसह माहेरी जायची; पण आता तिने माहेरी न जाण्याचा आणि नवऱ्याचा वा सासू-सासरे यांचा आग्रहही न मानण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण न्यायालयात आले आहे. (वृत्तसंस्था)

सल्लागारही गोंधळले
एखाद्याचे मद्यपान सोडवण्यासाठी समजूत घालता येते वा काही उपचारांनी ते बंदही करता येते; पण मद्यपान करायला भाग कसे पाडायचे, हा प्रश्नच आहे. भोपाळ कुटुंब न्यायालयाचे सल्लागार शैल अवस्थी यांनाही या प्रकरणाचे काय करायचे, हे कळेनासे झाले आहे.

Web Title: In order to drink alcohol to wife, husband in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.